लाॅकडाऊनमध्ये लोकांच्या मदतीसाठी रिलायन्स सरसावले; मोफत काॅल आणि रिचार्ज मिळणार

सर्वात कमी कालावधीत मोठी टेलिकॉम कंपनी ठरणाऱ्या रिलायन्स जिओने जिओफोन ग्राहकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेवढ्याचे रिचार्ज ग्राहक करतील तेवढ्याचेच रिचार्ज त्या महिन्यासाठी मोफत मिळणार आहेत.

तसेच रिचार्ज न करता पण जिओफोन ग्राहक दररोज १० मिनिटे फोनवर बोलू शकणार आहेत. जिओने ही घोषणा केल्यामुळे जीओफोन वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिओ महिन्याला ३०० रुपयांची मोफत आऊटगोईंग सर्व्हिस पण देणार आहे. या काळामध्ये पहिले होते तसेच इनकमिंग कॉल मोफत राहणार आहेत. कंपनीने असेही सांगितले आहे की ही ऑफर फक्त कोरोनाच्या काळातच चालू राहणार आहे.

कोरोनामुळे बऱ्याच राज्यांमध्ये लॉकडाऊन लागला असल्यामुळे बऱ्याच जणांना रिचार्ज करायला पण अडचणी निर्माण होत आहेत. ज्या लोकांना रिचार्ज करता येत नाही किंवा जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी या काळात रिचार्ज करणे जिकरीचे बनले आहे.

या त्रासातून सुटका व्हावी म्हणून कंपनी जरी रिचार्ज केला नाही तरी दिवसाला १० मिनिटे मोफत बोलायची सुविधा मोफत देणार आहे. अडचणीच्या आणि संकटाच्या काळात कंपनीने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

समाजातील मोठ्या वर्गाला या योजनेचा लाभ मिळेल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. जे जिओफोन ग्राहक रिचार्ज करणार आहेत त्यांच्यासाठी पण कंपनीने ऑफर दिली आहे. एक पॅक मारला तर त्यावर त्याच किंमतीचा दुसरा प्लॅन पण मोफत दिला जाणार आहे.

ताज्या बातम्या
ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या उपचारासाठी दोघा मित्रांनी दोन दिवसात जमा केले ३० लाख
तरुणीला वडिलांसाठी हवे होते ऑक्सिजन सिलिंडर; शेजाऱ्याने ठेवली घृणास्पद मागणी

एकेकाळी भाडे देण्यासाठी खिशात नव्हते पैसे, आज या अलिशान गोष्टी वापरून जगतोय राजा सारखे जीवन…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.