राज्य सरकारने दिले लॉकडाऊनचे संकेत, अशा असू शकतात नवीन गाईडलाईन्स

 

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे, त्यामुळे २ एप्रिलनंतर राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखल्या जात आहे.

अशात महाराष्ट्रात मर्यादित स्वरूपाचा लॉकडाऊन लावण्यात यावा, त्यासोबतच त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांनी तयार करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे नवीन गाईडलाईन्ससह २ एप्रिलपासून हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.

काय असतील असतील नवीन नियम-

१. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, ती ठिकाणे पूर्णपणे बंद केली जाऊ शकता.

२. एका मर्यादित वेळेपर्यंतच अन्नधान्याची दुकाने उघडी राहू शकतात.

३. सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या जाणार नाही, मात्र परिस्थिती बिघडल्यास जिल्हाबंदीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

४. सध्या काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण परिस्थिती पाहता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत संचारबंदी लागू करण्याची शक्यता आहे.

नवीन करण्यात आलेला लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे. तसेच हा लॉकडाऊन सुरुवातीच्या ७ ते ८ दिवस असण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.