मोठी बातमी! राज्यात पुढचे १५ दिवस लॉकडाऊन वाढवला; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई | देशात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात कडक निर्बंध करावे लागतील. तर रुग्णसंख्या कमी झालेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९२ टक्के आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. आपल्याला कोरोनासोबत राहायचं नाही. तर कोरोनावर मात करायची आहे. जनतेवर निर्बंध लादण्याचं कटू काम नाईलाजानं करावं लागत आहे. असं उध्दव ठाकरे म्हणाले आहे.

राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. राज्यात माझा डॉक्टर मोहीम राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कोरोना काळात प्रशासनाने केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. असं म्हणतं प्रशासनाचे कौतूक केले आहे.

कोरोनामुक्त गाव करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. तरूण सरपंच ऋतुराज देशमुख, कोमल करपे यांनी गाव कोरोनामुक्त केलं आहे. यांनी गावं कोरोनामुक्त केलं, तर आपण का नाही. या तरूण सरपंचांसोबत मी चर्चा करणार आहे. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

लॉकडाऊन हटवला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू दुकानं उघडू, आंदोलन करू. असं लोक म्हणतं आहेत. मी तुम्हाला सांगतो कोरोना सरकारी योजना नाही. रस्त्यावर उतरायचं असेल तर कोरोना योध्दे म्हणून उतरा असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील हॉटेलवर महापौरांनी टाकली धाड; हॉटेलने लसींसोबत आराम करण्याची दिली होती ऑफर
दुकानाबेहर लिहिले, शटर बंद असेल तर कॉल करा, आम्ही आत्म्याप्रमाणे इथे भटकत आहोत; पोलिसांनी दिले असे उत्तर
‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ चे ऑडिशन सुरु; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? मोबाईलवरूनही…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.