महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात दहा दिवसांसाठी लाॅकडाऊन जाहीर

मुंबई : राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत आहेत व रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आता करोना प्रतिबंधात्मक नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी करत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

वाचा काय काय असेल बंद…
सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा,  उद्याने, बगीचे बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळचा फेरफटका, सायंकाळाचा फेरफटका इत्‍यादी प्रतिबंधीत राहिल. तसेच शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील.

धार्मिक स्‍थळे/सार्वजनिक प्रार्थनास्‍थळे संपूर्णतः बंद राहतील. तथापी नियमित दैनंदिन धार्मिक विधी पुजाअर्चा चालू राहतील. याकामी संबंधीत पुजारी इ. यांचेसह फक्‍त एका व्‍यक्‍तीस परवानगी राहिल. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील.

राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने नियम आणखी कडक केले असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. नव्या गाईडलाईन्स नुसार राज्यात आजपासून रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल.

तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून राज्यात सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत मिशन बिगीन अगेनचे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

शेतकरी झाला मालामाल! एकदाच लागवड, ३५ वर्षे नफा; पहिल्याच वर्षी झाले ४ लाखांचे उत्पादन

कडक सॅल्युट! वडिल वारले, आई हॉस्पिटलमध्ये, पोलिसांनी त्या मुलाला घेतले दत्तक

अरे बापरे! बाईकवर मस्ती करायच्या नादात तरूण उडाला हवेत, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.