लॉकडाउनचा अनुभव सांगताना अजित पवारांनी केले कळकळीचे आवाहन; ‘कृपा करा…’

मुंबई : राज्यात कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका, याकरिता नियमांचे पालन करा,’ असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सोबतच कोरोनाच्या नियमांचे पालन करा, लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्या, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

अजित पवार पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, ‘आताचा करोना तर पूर्ण कुटुंबालाच वेढून टाकतोय. मी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांना बोलत होतो. आमच्या काही सहकाऱ्यांना सहकार्यांना देखील करोना झाला आहे. संख्या वाढत चालली आहे.’

तसेच लॉकडाउन केल्यानंतर अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जाते हे आपण पाहिले आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय. कसं जगायचं असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहे. पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि करोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनीही राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कचरावेचक दोन भावांच्या टॅलेंटवर फिदा झालेले आनंद महींद्रा त्यांच्यासाठी शोधताहेत शिक्षक
मुंबईत बड्या राजकारणी, अधिकाऱ्यांना पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल; मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !
केक आणि बरंच काही! पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंनी राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.