ऑफिसमधून वडील उशीरा घरी आल्यामुळे लहान मुलगी रागावली, पहा तिचा क्युट व्हिडिओ

मुंबई । सोशल मीडियावर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात . तर काही व्हिडिओ प्राण्यांचे असतात. तर काही व्हिडीओ कॉमेडी असतात. मात्र, सगळ्यात जास्त आवडणारे व्हिडीओ हे लहान मुलांचे असतात. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील मुलगी आपल्या वडिलांच्या कामावर दु:खी असल्याचे दिसून येत आहे. तिचे वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी आपल्या वडिलांवर रागवत आहे. ती आपल्या वडिलांना तुम्ही ऑफिसमध्येच राहा. तेच तुमचे घर आहे, असे लाडिवाळपणे म्हणत आहे. तसेच ऑफिसमध्ये राहिल्यानंतर जेव्हा जेवण मिळणार नाही, तेव्हा तुम्हाला आमची आठवण येईल.

जेवण न मिळाल्यामुळे मुलगी बरोबर बोलत होती, हेही तुम्हाला समजेल, असे व्हिडीओतील मुलगी आपल्या वडिलांना उद्देशून म्हणत आहे. तसेच या व्हिडीओत मुलगी आपल्या वडिलांना रागावत असताना तुम्ही वेळेवर घरी येत नाही, असे म्हणतेय. तुम्ही घरी आले नाही तर मम्मी जेवण करणार नाही. मग मम्मीची तब्येत खराब होईल.

त्यानंतर माझीही तब्येत खराब होईल. आम्ही दोघीही बेशुद्ध होऊन पडू. आम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही, असे ही मुलगी म्हणत आहे. ही मुलगी अतिशय रागात आपल्या वडिलांना बोलत आहे. मात्र, तिचा हा राग नेटकऱ्यांना हवाहवासा वाटतोय. पुढे रागामध्येच ही मुलगी आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल किंवा मेसेज करायला सांगते आहे.

दरम्यान, मुलीच्या रागवण्याचा अंदाज सर्वांनाच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भारावले असून मुलीच्या लडिवाळपणाचे ते चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, आणि सगळ्यांनाच या मुलीचे बोलणे आवडत आहे. या व्हिडीओला खूप लाईक आणि कमेंट देखील मिळत आहे.

ताज्या बातम्या

सुरैयाने देवानंदसोबत लग्न केले तर देशात दंगे होतील; ‘या’ कारणामूळे अधूरी राहिली देवानंद आणि सुरैयाची प्रेम कहाणी

हरभजनसिंगच्या घरी येणार नवीन पाहुणा, अभिनेत्री गीता बसराचे व्हर्च्युअल बेबी शॉवरचे फोटो व्हायरल..

  1. VIDEO’; काय सांगता! ही मांजर तर भविष्य सांगते, Euro 2020 सामन्यांबद्दल करतेय भविष्यवाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.