‘मला नवऱ्याकडे जायचंय’; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मिडिया हे दैनंदिन जीवनाचा घटक बनलेला आहे. यावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ, फोटो आपल्याला आवडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या सोशल मीडीयावर चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही चक्क नवऱ्यासाठी रडत आहे. मला नवऱ्याकडे जायचं आहे, असे ती रडत आईला सांगते. या चिमुरडीच्या या क्युटनेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दरम्यान, या व्हिडीओला ट्विटरवर Vijay Kumar नावाच्या एका यूजरने शेअर केले आहे. ‘मुलं पण ना.. कोन समजवणार यांना…’, असं कॅप्शन यूजरने व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे. याचबरोबर सोशल मिडीयावर सध्या हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडीओतील चिमुकली आपल्या आई आणि आजीकडे पतीकडे जाऊद्या, असा हट्ट करत आहे. तिची आई आणि आजी तिला पती म्हणजे नेमकं कोण? असा प्रश्न विचारतात. त्यावर ती मामा असं उत्तर देते. पण मामा तर मामीचा पती असतो. बाबा आईचे पती असतात, असं एक महिला तिला सांगतेय. यावर ती चिमुकली माझा पती कोण आहे? असे विचारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नाथाभाऊ गरजले; ‘ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण…’
बाबो! मानसी नाईकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; सोशल मिडीयावर घालतोय तुफान धुमाकूळ
कंगना मागणार का शेतकऱ्यांची माफी? काँग्रेस नेत्यांची धमकी; ‘शेतकऱ्यांची माफी माग नाहीतर…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.