कडक सल्युट! तीन चिमुकल्यांनी सर केले महाराष्ट्रातील सर्वोच्च ‘कळसुबाई शिखर’

५४०० फूट उंच असणारे आणि चढायला अवघड असणारे कळसुबाई शिखर झपाझप चढून भ्रमंती करण्याचे साहस नागपूर जिल्ह्यातील तीन चिमुकल्या मुलांनी केले आहे. तेही अवघ्या साडेचार तासांत. श्लोक डुडुलकर, गुरुकांत भोसे, प्रिशा भोसे ही या मुलांची नावे आहेत.

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर म्हणजेच ५४०० फूट आहे. तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. या चिमुकल्यांनी १८ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता शिखर चढायला सुरुवात केल्यानंतर दुपारी अडीचला ते शिखरावर पोहोचले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे शिखर सर केले आहे.

या तीन चिमुकल्यांमधील गुरूकांत हा बारा वर्षांचा आहे. तर श्लोक व प्रिशा हे केवळ दहा वर्षांचे असून ते टेनीसपट्टू आहेत. या तीन मुलांनी अपंग साहसवीर व मार्गदर्शक अशोक मुन्ने यांच्या नेतृत्वात हे शिखर सर केले आहे. अशोक मुन्ने यांनी माऊंट एव्हरेस्ट, नेपाळमधील मीरा पीक, कुगती पार्कसह अनेक अवघड शिखरे चढले आहेत. हे तिघेही मुन्ने यांच्या ‘अमर द कॅम्प’ चे सदस्य आहेत. तसेच सोबत तिघांसोबत आईवडील होते.

या तीन चिमुकल्यांच्या नियमित सरावांमुळे हे कठीण शिखर सर शक्य झाले आहे. तसेच कळसुबाईनंतर आता तिघांनीही पंधरा हजार फूट उंचीच्या हिमालयात बर्फावरून चढायचे आहे. यापूर्वी एका मुलाने अवघ्या नवव्या वर्षी हे शिखर सर करून रेकॉर्ड केला होता.

महत्वाच्या बातम्या

जॅकीची दहशत इतकी होती की साक्षात दाऊद पण म्हणाला होता की जॅकीशी पंगा नको रे बाबा

जाणून घ्या मिलिंद गवळी यांची खरी लव्ह स्टोरी; लग्नासाठी ठेवली होती ‘ही’ अट

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती; ७/१२ च्या नावात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती करायची सोपी पद्धत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.