देवा, बच्चू भाऊले निगेटिव्ह आणून दे..लहानग्याने ढसाढसा रडत देवाला घातले साकडे

मुंबई | राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे असे त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या समर्थकांना बच्चू कडू यांची काळजी वाटू लागली आहे.

बच्चू कडू यांचा एक बाल समर्थकाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. बच्चू कडू यांना बरं वाटावं म्हणून त्याने देवा बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणून दे..असं म्हणत देवाला साकडे घातले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

स्वतः बच्चू कडू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हीडीओत एक चिमुकला ढसाढसा रडताना दिसत आहे. देवा बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणून दे, बच्चूभाऊ तुम्ही लवकर बरे व्हा. भाऊंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे…त्यांना काहीच होऊ देऊ नको, अशी प्रार्थना करताना तो दिसत आहे.

बच्चू कडू हा व्हिडिओ शेअर करत म्हणाले आहेत की, बेटा मला काहीच नाही होणार, औषधी सोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खुप मोठा हो सेवा कर.., असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, बच्चू कडू याना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना काळातही बच्चू कडू सातत्याने प्रवास करत होते. बच्चू कडू यांची पत्नी नयना कडू यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील एकूण १२ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अमोल कोल्हे लोकसभेत गरजले! ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी केंद्राकडून राज्याला वागणूक

मोदी सरकारकडून ४ वर्षात १८ हजार बांगलादेशी व पाकिस्तानींना भारताचे नागरिकत्व बहाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.