अभिनेत्री लिसा हिडेन तिसऱ्यांदा होणार आई; व्हिडिओ शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री आल्या. पण काहींनी मात्र त्यांच्या अदाकारिनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांचे स्थान कायम केले.

अशीच अभिनेत्री म्हणजे लिसा हिडेन. बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा समावेश होतो. खुप कमी वेळात तिने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. पण त्यानंतर मात्र ती चित्रपटांपासून लांब गेली.

चित्रपटांपासून लांब असली तरी ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

लिसा सध्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खुप व्यस्त आहे. लिसा दोन मुलांची आई आहे. आत्ता परत एकदा ती आई होणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना ही गुड न्युज दिली आहे.

लिसाने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, ती तिसऱ्यांदा आई होणार आहे. तिच्या या व्हिडिओ काही लोकांनी पसंत केले तर काही लोकांनी तिला या गोष्टीवरून ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

लिसाने यापूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यानंतर आत्ता ती परत एकदा आई होणार आहे. ही गोष्ट समजताच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांनी दिला आई होण्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या.

एक युजर म्हणाला की, ‘तुम्ही तिसऱ्यांदा आई होणार आहात तुम्हाला लाज वाटली पाहिजे’. एक युजर म्हणाला, ‘तुमच्यासारख्या लोकांमुळेच देशाची लोकसंख्या वाढत आहे. लाज वाटू द्या’. या गोष्टींवर लिसाने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ती आई होण्याचे सुख एन्जॉय करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

मला किस करशील का? चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवी कपूरने दिले भन्नाट उत्तर

का तुटलं अंकिता आणि सुशांतसिंगचं नातं? अखेर अंकिताने सांगितलं खरं कारण

सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा

करण जोहरने त्याच्या करोडोंच्या संपत्तीमध्ये शाहरुख खानच्या मुलांना दिला आहे वाटा; कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.