सिंहाच्या आणि बिबट्याच्या लढाईत बिबट्याला वाचवायला आला हत्ती, पहा मग पुढे काय झालं..

जंगलात प्रत्येक प्राणी आपली भुक भागवण्यासाठी शिकार शोधत असतो. सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांच्या शिकारीच्या व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच शिकार करताना अनेकदा वेगळ्याच गोष्टी घडत असतात, त्याचे पण व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होत असतात.

आता असाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये सिंह बिबट्याची शिकार करण्यासाठी येतो. तेव्हा सिंह जेव्हा हल्ला करतो, त्याच क्षणी एक हत्ती बिबट्याची मदत करण्यासाठी पुढे येतो.

हा व्हिडिओ युट्युवरचा असून लॉयन किंग नावाच्या एका युट्युब चॅनलवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की बिबट्या एका ठिकाणी आराम करत आहे, त्याचवेळी शिकार करण्यासाठी सिंह त्या ठिकाणी येतो.

सिंह शिकारच्या शोधात असतानाच त्याची नजर बिबट्यावर जाते. तोपर्यंत सिंहाची चाहूल बिबट्याला लागते. सिंह तिथे येतो आणि दोघांची लढाई सुरु होते. सिंहापुढे टिकता येणार नाही, म्हणून बिबट्या तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, पण सिंह पण त्याच्या पाठीमागे लागतो.

तितक्यात समोरुन एक हत्तीचा कळप येतो. सिंहाच्या तावडीतुन बिबट्याला वाचवण्यासाठी हत्ती सिंहावर चाल करुन जातो. तेव्हा सिंह हत्तीला घाबरुन लांब पळून जातो.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.या व्हिडिओला आतापर्यंत १२ हजार लोकांनी पाहिले आहे. तसेच हा सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक या व्हिडिओ कमेंट करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री शिल्पा शिंदेनी बदलली फिल्ड; आता करतेय कंस्ट्रक्शन साईटवर काम, पहा व्हिडिओ
अभिनेत्रीसोबत डायरेक्टरला करायचा होता किसिंग सीन; स्वत:च सांगितला बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव
सलमाननंतर आता केआरकेने मिकासिंगशी घेतला पंगा; मिका सिंग म्हणाला, मी केस नाही करणार कानाखाली मारेन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.