Share

बहिणीप्रमाणे त्याला करायची होती देशसेवा, पण पोलिसांच्या गोळीबारात झाला मृत्यू; जाणून घ्या राकेशची कहाणी

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. सर्वाधिक विरोध बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमधून होत आहे. शुक्रवारी तेलंगणातील(Telangana) सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर तरुण विद्यार्थ्यांनी ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.(Like his sister, he wanted to serve the country, but was shot dead by police)

यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. गोळीबारात मृत पावलेल्या २१ वर्षीय तरुणाचे नाव दामोदर राकेश असे आहे. राकेश हा तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. राकेशची बहीण बीएसएफमध्ये कार्यरत आहे. तर वडील टीआरएसचे नेते आहेत. राकेशचे वडील शेतकरी आहेत.

या घटनेमुळे सध्या तेलंगणातील वातावरण चांगलचं तापलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दामोदर राकेश हा २१ वर्षीय तरुण सैन्याच्या परीक्षेची तयारी करत होता. राकेशच्या वडील शेतकरी असून ते टीआरएस या पक्षाशी संबंधित आहेत. राकेशच्या वडिलांचे नाव डमेरा कुमारस्वामी असे आहे. तर आईचे नाव पुल्लम्मा असे आहे.

राकेश तीन वर्षांपासून सैन्याच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याने सैन्याच्या परीक्षेची शारीरिक चाचणी देखील पूर्ण केली होती. तसेच राकेश लेखी परीक्षा देखील उत्तीर्ण झाला होता. राकेशची बहीण त्याला सैन्यात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करत होती. राकेशवर वारंगलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राकेशच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तेलंगणा सरकारकडून राकेशच्या कुटूंबियांनी २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच कुटूंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राकेशच्या मृत्यूसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्राच्या सदोष धोरणाला जबाबदार धरले आहे.

शुक्रवारी तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तोडफोड करत एका ट्रेनला आग लावली होती. यावेळी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जवळपास ५०० आंदोलक होते. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी १५ राऊंड फायर केले होते. यामध्ये १२ जण जखमी झाले होते. यावेळी गोळी लागल्याने राकेशचा मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या :-
एक तास हे महाकठीण काम करुनही थकली नाही प्राजक्ता: म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत हे करत असाल…
१०० व्या वाढदिवसानिमित्त मोदींची आईला खास भेट, ‘या’ रस्त्याला देणार आईचे नाव
35 % वाल्या लेकास बापाने दिला ‘असा’ धीर; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now