मी माझं आयुष्य जगलेय, माझा बेड या तरुणाला द्या, आज्जीमुळे वाचला तरुणाचा जीव

देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अनेकांना उपचारासाठी बेड देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेकांचे मृत्यू देखील होत आहेत. अशातच एका आज्जीने स्वताचा ऑक्सिजन बेड एका युवकाला दिला आहे.

राजस्थानमधील एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने एका युवकासाठी रुग्णालयातील आपला बेड दिला आहे. ही महिला स्वतः ऑक्सिजन होती. मात्र, तरीही एका युवकाला प्रचंड त्रास होत असल्याचे दिसताच तिने स्वतः खुर्चीवर बसूनच ऑक्सिजन घेतला.

या आज्जीने स्वतःचा बेड या युवकाला दिला आहे. यामुळे या आज्जींचे कौतुक केले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणाला सहज बेड उपलब्ध होत नाही, त्यांनी लहान मुलं असणाऱ्या ४० वर्षांच्या तरुणाला आपला बेड दिला.

लेहर कंवर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. चार तास वाट बघितल्यानंतर लेहर यांना एक बेड मिळाला मात्र तितक्यात त्यांची नजर गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका युवकावर गेली.

या तरुणाना कोरोना झाला होता, त्याची परिस्थिती फार गंभीर होती. यामुळे या आज्जीने आपला ऑक्सिजन बेड त्याला देण्यास सांगितले. डॉक्टरांना बोलावून त्यांनी आपला बेड त्याला दिला.

मी माझ्या वाट्याचे जीवन जगले. मात्र, या व्यक्तीची लहान मुले आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर उपचार करा. माझा बेड सध्या त्यांना द्या. यावेळी बाबूरामची ऑक्सिजन लेवल 43 वर पोहोचली होती. त्याला तात्काळ उपचार मिळाले नसते तर कदाचित त्यांचा मृत्यू झाला असता.

ताज्या बातम्या

झोपण्यापूर्वी उशीखाली लिंबू ठेवल्यास आयुष्यातील ‘या’ त्रासांपासून नक्की मुक्ती मिळवाल

कोरोना लस टोचताच अंकिता लोखंडेने सुरु केला स्वामींचा जप; पहा तिचा मजेदार व्हिडिओ

दिलीप कुमारच्या त्या डॉयलॉगचे कोरोना कनेक्शन; पहा दिलीप कुमारांचा व्हायरल व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.