सापशिडी सारखं आयुष्य झालंय, लाॅकडाऊन संपायची तारीख जवळ आली की साप गिळून पुन्हा…

मुंबई । सापशिडी सारखं आयुष्य झालं आहे. लाॅकडाऊन संपायची तारीख जवळ आली की, साप गिळून पहिल्या जागेवर आणून ठेवतोय, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे, कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडाही सहा लाखांवर जाऊन पोहचला आहे. संदीप देशपांडे यांनी यावर ट्विट करत हतबलता व्यक्त केली आहे.

राज्यात लाॅकडाऊन लागू होऊन अनेक दिवस गेले आहेत. लाॅकडाऊन शिथील होऊन जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाला पुन्हा एकदा नाईलाजास्तव लाॅकडाऊन लागू करावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राज्यातील लाॅकडाऊन शिथील केला असला तरी स्थानिक प्रशासन कोरोना बाबतचा आढावा घेऊन लाॅकडाऊन नव्याने लागू करत आहेत. कोरोना संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन हाच योग्य पर्याय असल्याचे दिसत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.