लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर कंगणावर भडकल्या! म्हणाल्या, लाज वाटली पाहीजे तुला

मुंबई | कंगणा राणावत कायम तिच्या वादग्रस्थ वक्तव्यामुळे चर्चेत असते. गेले काही दिवस झाले ती मुंबई वरती केलेल्या विधानामुळे वादात आहे. अशातच तिने अजून एक वक्तव्य केले आहे. आणि नवीन वादाला सुरुवात केली आहे.

ती चक्क बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्नस्टार असे म्हणाली आहे. टाइम्स नाऊशी बोलताना तिने हे वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्यावरती लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगणाच्या या वक्तव्यामुळे लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर चांगल्याच भडकल्या आहेत. उर्मिला तुझा अभिमान वाटतो असे म्हणत त्यांनी उर्मिलाची बाजू घेतली आहे. कंगणा तुझी लाज वाटते असे म्हणून तिचा विडिओ ट्विटरद्वारे त्यांनी शेयर केला आहे.

कंगणाच्या या टिकेवरती उर्मिलाने एका ट्विटद्वारे नाव न घेता तिच्यावरती निशाणा साधला. सूड माणसाला जाळत असतो, संयमच सुडावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय असतो’ असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.