आता खरा राडा! सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची ‘बिग बॉस ३’ मध्ये एन्ट्री

कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस’ मध्ये स्पर्धकांची जोरदार एन्ट्री झालेली आपल्याला पाहायला मिळाली. या वर्षी बिग बॉसचा तिसरा सिजन पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत. रविवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून  कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात धमाकेदार परर्फोमन्स करून एक एक स्पर्धक समोर आला.

‘बिग बॉस ३’ मराठीच्या घरात अनेक परिचित-अपरिचित सदस्य पाहायला मिळाले. अभिनेत्री सोनाली पाटील आणि अभिनेता विशाल निकल याशिवाय स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष आनंद शिंदे, अविष्कार दारव्हेकर यांची एन्ट्री झाली आहे.

आपल्याला ‘बिग बॉस ३’ मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्ती आणि भूमाता ब्रिगेड संस्थेची संस्थापिका तृप्ती देसाई याची देखील एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे बिग बॉसच्या घरात राडा होणार हे नक्की असल्याचे समजते.

तृप्ती देसाई यांनी  शनी शिंगरणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं. या गोष्टीची जोरदार चर्चा सर्वत्र होत होती. तसेच तृप्ती देसाई सोशल मिडीयावर देखील प्रचंड सक्रीय असलेल्या पाहायला मिळतात.

मागील दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमांगी कवीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केला होता. त्यामध्ये ती चपाती लाटताना दिसत होती. यावर नेटकऱ्याच्या अनेक लाजिरवाण्या कमेंट आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तसेच काही चाहत्यांनी कौतुकही केले होते.

हेमांगीच्या या व्हिडिओवर तृप्ती देसाई यांनी देखील एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी हेमांगीला तिखट शब्दात ‘शिर्डीच्या ड्रेसकोडसाठी आम्ही रान पेटवल तेव्हा या कुठे होत्या? पुढे त्यांनी म्हटलं आहे. तसेच जेव्हा इंदोरीकर महाराज महिलांविरुध्द बदनामीकारक वक्तव्य करतात तेव्हा या कुठे होत्या? असे देखील प्रश्न केले आहेत.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या म्हणण्यानुसार ‘आम्हीसुद्धा स्त्रियांच्या याच स्वातंत्र्यासाठी झगडतो, लढतो मात्र तेव्हा हे लोक का आम्हाला पाठींबा देत नाहीत. किंवा प्रविण तरडेसारखा अभिनेता का आम्हला पाठींबा दर्शवत नाही. तृप्ती देसाई यांच्या हा स्पष्टवक्तेपणा ‘बिग बॉस’च्या घरात कोणता नवीन राडा करणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या मागे ईडी लागतेय, भाजपचे सर्व नेते काय धुतलेल्या तांदळासारखे आहेत काय?
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिहून अटकेचे चॅलेंज देणाऱ्याला चोप चोप चोपले
पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षित कोणतीच जागा नाही, म्हणणाऱ्या वसीम अक्रमच्या पत्नीला पाकिस्तानी लोकांनीच झोडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.