एलआयसी पॉलिसी धारकांसाठी धोक्याची घंटा; एका कॉलवर गायब होईल आयुष्यभराची कमाई

कोरोना विषाणूच्या काळात लोक लॉकडाऊनमुळे घरी होते. लोक घरी असल्यामुळे त्यांनी घरी बसल्या बसल्या ऑनलाईन व्यवहार करायला प्राधान्य दिले आणि त्यामुळे फसवणुकीचे प्रकार पण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले.

बँक ग्राहकांची फसवणूक करून झाल्यावर काही जणांचा मोर्चा आता एलआयसी पॉलिसीधारकांकडे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एलआयसी पॉलिसीसधारकांच्या फसवणुकीच्या प्रमाणात पण मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

एलआयसीने त्यांच्या पॉलिसीधारकांसाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार एलआयसी धारकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. एलआयसीच्या यासंदर्भातील अधिक माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून पण दिली आहे.

एलआयसीने यात म्हटले आहे की, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॉल येईल. त्यातून पलीकडून एलआयसीच्या एजंट बोलत असल्याचे सांगण्यात येईल. आपण त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन एलआयसीच्या वतीने करण्यात आले आहे.

एलआयसीने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्हाला कॉल करून एलआयसी अधिकारी बोलत असल्याचे सांगण्यात येईल. पण तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कॉल करून सध्या चालू असलेली एलआयसी सरेंडर करण्यास सांगितले जाते. मात्र ज्याच्याकडे एलआयसीने दिलेले ओळखपत्र नसेल त्याच्याकडून आपण पॉलिसी खरेदी करू नये असे सांगण्यात आले आहे. आपल्याला जर यासंदर्भात काही अडचण असेल तर आपण जवळच्या एलआयसी ऑफिसला भेट द्या किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

ताज्या बातम्या
‘तुझ्यामुळे मुस्लीम स्त्रियांचं नाव खराब होतं’, अंजुम फकीहच्या बिकिनी लूकवर नेटकरी भडकले

सचिन वाझेंचे शिवसेना मंत्री अनिल परबांशी संबंध; किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

1 ते 5 कोटीपर्यंतचे कर्ज मिळणार चुटकीसरशी; घ्या अधिक जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.