१५० रुपयांमध्ये घेतलेल्या एलआयसी पॉलिसीवर मिळवा १९ लाख, गरज असेल तेव्हा पैसे परत

गुंतवणूक म्हटल की एलआयसी हे समिकरण आपल्याकडे आहे. कारण एलआयसी ही देशातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी आहे. या कंपनीने ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे. यामध्ये पालकांना मुलांच्या भविष्यासाठी काळजी करण्याची गरज नसणार आहे.

सरकारव्दारे चालविल्या जाणाऱ्या एलआयसी या कंपनीच्या विविध योजनांमुळे ग्राहकांचा आतापर्यंत खूप फायदा झाला आहे. तसेच काही लोकांना भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असुनही योजनांची माहिती नसल्याने पश्चाताप झाल्याचे दिसते. परंतु आता वेळीच मुलांच्या शिक्षण, लग्न यांसारख्या महत्त्वाच्या क्षणात लागणाऱ्या पैशांची सोय तुम्हाला करता येईल. त्यासाठी एलआयसीने योजना आणली आहे त्या योजनेचं नाव ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’ असं आहे.

जाणून घ्या या योजनेची वैशिष्ट्ये-
या विमा पॉलिसीसाठी कमीत-कमी वय ० वर्ष आहे.
विमा घेण्याचे कमाल वय १२ वर्षे आहे.
याची किमान विमा रक्कम १०,००० रुपये आहे.
विम्याच्या रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही.
यामध्ये प्रीमियम वेव्हर बेनेफिट रायडर पर्याय उपलब्ध आहे.
मॅच्युरिटीचा एकूण कालावधी २५ वर्षे आहे.

मनी बॅक : या योजनेंतर्गत मुलगा किंवा मुलगी १८ वर्ष, २० वर्ष, २२ वर्षांचे झाल्यानंतर विम्याच्या मूलभूत रकमेपैकी २० टक्के रक्कम दिली जाते.
उर्वरित ४० टक्के रक्कम २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकास दिली जाते.
पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसीधारकाला उर्वरित रकमेपैकी ४० टक्के रक्कम बोनस मिळेल.

प्रत्येकजण आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहतो. तर तुमच्या मुलांच्या गरजा लक्षात घ्या आणि तुमच्या सोईने गुंतवणूक करा. तसेच कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापुर्वी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या-
पोस्टाच्या ‘या’ जबरदस्त योजनेत 100 रुपये गुंतवा आणि व्हा लखपती; जाणून घ्या सविस्तर..
शेतजमिन विकत घेण्यासाठी एसबीआय देणार ८५% रक्कम; जाणून घ्या योजनेची पुर्ण माहिती
सरकारची ‘ही’ स्कीम पुन्हा झाली खुली, गुंतवणुकदारांना स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी
IND Vs ENG : सिराजने धरला कुलदीप यादवचा गळा, ड्रेसिंग रूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.