एलआयसी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र बंब यांच्या घरावर काल आर्थिक गुन्हे शाखेने अचानक छापा टाकला. या छापेमारीदरम्यान विमा एजंट(Policy Agent) राजेंद्र बंब यांच्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीदरम्यान विमा एजंट राजेंद्र बंब हे अवैध सावकारी करत असल्याचे समोर आले आहे. (LIC king rajendra bamb home raid police )
आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या छापेमारीत विमा एजंट राजेंद्र बंब यांच्या घरातून सुमारे १ कोटी ४२ लाख रुपयांची रोकड आणि ४६ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात विमा एजंट राजेंद्र बंब यांच्या जनता बँकेतील लॉकरची देखील तपासणी करण्यात आली आहे. या बँक लॉकरमध्ये तब्बल सुमारे २ कोटी ५४ लाखांची रोकड आणि १९ लाख किंमतीचे दागिने सापडले आहेत.
हा सर्व मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे. जनता बँकेत राजेंद्र बंब यांच्या नावावर आणखी दोन लॉकर आहेत. या दोन लॉकरची तपासणी सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. या बँक लॉकरमधून आणखी किती रोकड आणि दागिने सापडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमा एजंट राजेंद्र बंब यांच्याकडे आतपर्यंत एकूण ४ कोटी रुपयांची रोकड आणि ६५ लाख रुपयांचे दागिने सापडले आहेत. यासह कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सापडली आहेत. विमा एजंट राजेंद्र बंब यांच्याकडून १४० खरेदी खत आणि २०४ मुदत ठेवीच्या पावत्या देखील आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र बंब यांची ओळख धुळे जिल्ह्यातील मोठे एलआयसी एजंट अशी आहे. या परिसरातील लोक त्यांचा उल्लेख एलआयसी किंग असा करतात. राजेंद्र बंब हे एका बनावट फायनान्स कंपनीच्या मार्फत अवैध सावकारी करत होते. राजेंद्र बंब हे २४ टक्के व्याजदराने कर्जदारांकडून वसुली करत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
एका पीडित व्यक्तीने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत विमा एजंट राजेंद्र बंब यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात विमा एजंट राजेंद्र बंब यांच्याकडे कोट्यवधींची रोकड आढळून आली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
तिन्ही बाजूंनी केली फायरिंग, मग मृत्यु झाल्याचं केलं कन्फर्म, मुसेवालाच्या मित्रांनी सांगितला थरारक घटनाक्रम
PHOTO: मिया खलिफाने रेड बिकीनीमध्ये दाखवला हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते झाले बेकाबू
गाण्याचे शिक्षण घेतले नाही तरी केले ३५०० हून अधिक गाण्यांवर काम, वाचा केकेच्या न ऐकलेल्या गोष्टी