‘त्या’ पत्रानंतर मोठ्या घडामोडींचे वेग! कोणत्याही क्षणी परमबीर सिंग यांना अटक होण्याची शक्यता

मुंबई । काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चर्चेत आहेत. आता यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. परमबीर यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना कधीही अटक केली जाऊ शकते. अकोल पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी परमबीरसिंह यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.

त्यानुसार परमबीरसिंह यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांचे नाव अनेक प्रकरणात पुढे येत आहे.

ठाण्यामध्ये आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. तसेच अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडून ते सोन्याची बिस्कीटे भेट म्हणून घेत असल्याचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध यंत्रणेकडे दिले आहे.

आता त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.

गेल्या एक महिन्यापासून राज्यात परमबीर सिंग प्रकरण गाजत आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाना साधला आहे.

ताज्या बातम्या

‘लागीर झालं जी’ मधील साध्या भोळ्या जयडीचे हॉट फोटो व्हायरल; फोटो पाहून घायाळ व्हाल

जगातील अशी एक जागा ज्या ठिकाणी महिला आपले अंतर्वस्त्रे सोडून जातात

शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.