‘दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा’, रोहित पवारांनी मोदींकडे केली मागणी

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं उघड झाल्यानंतर दाऊदला भारतात आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून दाऊदला भारतात आणण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

आज रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींकडे मागणी केली आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं पाकिस्तानने कबूल केलं आहे. आता दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, दाऊद इब्राहिम आपल्याच भूमीवर असल्याची कबुली पाकिस्तानने काल दिली होती. मात्र अवघ्या 24 तासांच्या आत पाकिस्ताननं यू-टर्न घेत दाऊद देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानने स्वत:च दाऊदच्या वास्तव्याची कबुली दिल्यानं त्याबद्दलचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं. त्यानंतर पाकिस्तानने स्पष्टीकरण दिलं. दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा त्यांनी केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.