‘जाणून घेऊयात ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीचे ‘१०’ विक्रम जे कोणलाही मोडणं सहज शक्य नाही’

 

मुंबई | भारतीय संघाचा ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी याचा आज ३९ वा वाढदिवस आहे. त्याने २००४ साली क्रिकेटविश्वात पदार्पण केले होते.

या नंतर धोनीने मैदानावर असताना अनेक विक्रम केले आहे. जे कोणालाही मोडणं सहज शक्य नाहीये. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आपण महेंद्रसिंग धोनीचे असे ‘१०’ विक्रम आपण पाहणार आहोत.

१) महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आतापर्यंत तीन मोठ्या ट्रॉफी आहेत. ज्यात २००७ सालचा ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक, २०११ सालचा वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. धोनीने भारताला आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आणले आहे.

२) महेंद्रसिंग धोनी जगातील तिसरा सर्वोतकृष्ठ यष्ठीरक्षक आहे, की ज्याने ५०० सामन्यांत ७८० फलंदाजाना बाद केलं आहे. यात पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर आणि दुसर्‍या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलक्रिस्ट आहे.

३) सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत १७८ स्टंपिंग्स केले आहेत.

४) धोनीने वनडे सामन्यात आतापर्यंत एकूण २१७ षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकारांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानावर आहे.

५) धोनी पहिला अस खेळाडू आहे ज्याला सलग दोन वेळी आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून मान मिळाला.

६) आफ्रो आशियाई चषक स्पर्धेत महेला जयवर्धनेबरोबर केलेली २१८ धावांची भागीदारी अद्याप विश्वविक्रमी भागीदारी ठरली आहे.

७) धोनीने आतापर्यंत एकूण ९ वेळा गोलंदाजी केली होती. धोनीने पहिली विकेट वेस्ट इंडीज विरुद्ध २००९ मध्ये मिळाली होती.

८) सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने सर्वाधिक शतके ठोकली आहेत.

९) धोनीच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे . ज्यात त्याने आपल्या १००० धावा कोणत्याही अर्धशतकाशिवाय धोनीने केल्या आहेत.

१०) धोनीने कारकिर्दीतील टेस्ट आणि वनडे सामन्यातील पहिलं शतक पाकिस्तानच्या विरुद्ध मारलं होतं. ज्यात त्याने १४८ धावांची सुंदर खेळी केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.