विरोधकांना त्यांचे काम करू द्या आपण आपले काम करू; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाणे महापालिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाण साधला.

म्हणाले, ते विरोधक आहेत त्यांना त्याचे काम करू द्या, आम्ही आमचे काम करत आहोत. असा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

अनेक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे नागरिक घरी आहेत. त्यामुळे आपण जरी कोरोनाला कंटाळलेलो असलो तरी कोरोना आपल्याला कंटाळलेला नाही.

त्यामुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला, राज्य सरकारला सहकार्य करावे असेही, आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

पुढे ते असेही म्हणाले की, ठाणे परिसरात रुग्णसंख्या वाढत असून, ही साखळी आपल्याला रोखायची असेल तर नागरिकांना घरीच राहावे लागेल.

आदित्य ठाकरेंनी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्यासह चार महापालिकेच्या आयुक्तांबरोबर तातडीने बैठक घेतली.

याबैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.