Share

Gopichand Padalkar : माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळकरांचे मोठे वक्तव्य

Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने मिळालेल्या ‘धर्मरक्षक’ पुरस्कार कार्यक्रमात ठणकावून सांगितले की, “माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. मी गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवत धर्मांतराच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीला विरोध करत राहणार आहे.”

गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढावेत आणि माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली आहे. या प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस देखील प्राप्त झाली आहे. मात्र, गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवत त्यांनी ज्या चुकीच्या धर्मांतर प्रकरणांना विरोध केला आहे, त्यात आमचा सहभाग कायम राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदूंवर अन्याय होत असेल तर ती भूमिका ठाम

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, समाजात अजूनही मुघल प्रवृत्तीचे लोक आहेत आणि त्यांना योग्य त्या पद्धतीने रोखणे आवश्यक आहे. एकीकडे सर्वधर्म समभावाची चर्चा केली जाते, परंतु हिंदूंवर जबरदस्तीने धर्मांतरण का केले जाते? जर हिंदूंवर अन्याय होत असेल, तर त्याविरुद्ध मी नेहमी आक्रमक भूमिका घेणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सुप्रिया सुळेंवर त्वरित प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (Nationalist Congress Party) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विधान केले होते, “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय?” या विधानावर गोपीचंद पडळकर यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, “आमच्या पांडुरंगाला मटण चालत नाही. जे देव मांसाहार करतो, तो देव मशिदीत असावा. आज वारकऱ्यांच्या मनावर अशा विधाने केली जात आहेत. मताच्या राजकारणासाठी लोक कुठल्या थराला जातात, त्याचे नेम नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेत पुन्हा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now