रामदास आठवलेंनी दत्तक घेतला बिबट्या; बिबट्याला दिलेल्या नावाची होत आहे सर्वत्र चर्चा

मुंबई | मागील वर्षीप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यंदाही बिबट्या दत्तक घेतला आहे. गेल्या वर्षी त्यांनी भीम नावाचा बिबट्या दत्तक घेतला होता. मात्र त्याचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे यंदा त्यांनी दोन बिबटे दत्तक घेतले असून केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा केला आहे.

याबाबत बोलताना आठवले म्हणतात, ‘पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग संवर्धनासाठी; प्राणीप्रेम जोपासण्याचा संदेश देण्यासाठी आपण बिबट्या दत्तक घेतला आहे. निसर्ग साखळी टिकविण्यात बिबट्याची महत्वाची भूमिका असते. माझे नेतृत्व भारतीय दलित पँथर मधून पुढे आले आहे.

तसेच अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर तर तशी भारतात दलित पँथर ही संघटना होती. दलित पँथर पासून आम्हाला पँथर बद्दल विशेष प्रेम असल्यामुळे पँथर दत्तक घेतला. या पँथरचे नाव सिंबा ठेवण्यात आले आहे. अशी माहितीही रामदास आठवले यांनी दिली आहे.

यापूर्वी आठवले यांनी भीम नावाचा पँथर दत्तक घेतले होता. त्याचा हृदय विकाराने मृत्यू झल्यानंतर वन विभागाविरुद्ध आरपीआय तर्फे आंदोलन करण्यात आले होते. वन्य प्राणी दत्तक योजनेत दत्तक घेतलेल्या बिबट्याच्या संभाळासाठी वार्षिक १ लाख २० हजार रुपये शुल्क आठवले यांनी वन विभागाला अदा केले होते.

महत्त्वाच्या बातम्या
दिवंगत अभिनेता चिरंजीवीच्या मुलाला पाहिलेत का?, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक
काय सांगता! पंतप्रधान मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार
अरुण गवळी होणार आजोबा; लेकीने फोटो शेअर करत दिली गोड बातमी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.