Leopard attack Ganesh Naik: महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांत माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकार आता एक वेगळा आणि थोडासा धाडसी उपाय योजत आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी सांगितले की, बिबट्यांना (Leopard attack) जंगलाबाहेर येऊन माणसांवर हल्ला करायची गरज भासणार नाही, म्हणून जंगलातच त्यांच्यासाठी पुरेसा अन्नसाठा उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी वन विभागाने ठरवले आहे की जंगलात १ कोटींपेक्षा जास्त शेळ्या-बकऱ्या (Goats) सोडल्या जातील, ज्या बिबट्यांचे खाण्याचे भक्ष्य ठरेल.
पुणे, जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यात याची सुरुवात झाली असून काही ठिकाणी वन विभागाने आधीच या शेळ्या-बकऱ्या सोडल्या आहेत. गणेश नाईक (Ganesh Naik) म्हणाले, “हिंस्र प्राण्यांना खाण्याचे भक्ष्य जंगलातच उपलब्ध असावे. प्रत्येक गावात जसे नंदी असतो, तशीच जंगलात बिबट्यांसाठी शेळ्या-बकऱ्या असतील. नागरिकांनी त्या प्राण्यांचे रक्षण करावे. यामुळे तुमच्या मुलांवर, कुटुंबीयांवर बिबट्यांचा धोका कमी होईल.”
वनमंत्री यांनी बिबट्यांचा पूर्वीचा जीव आणि आजच्या परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “बिबटे आता फक्त जंगलात राहत नाहीत; ऊसाच्या फडातही त्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बिबटे शेड्यूल 1 मध्ये आहेत, पण त्यांचा समावेश शेड्यूल 2 मध्ये करण्यासाठी केंद्रीय वनखात्याला प्रस्ताव पाठवला आहे. जंगलाबाहेर राहणाऱ्या बिबट्यांना ‘वन्यजीव’ म्हणून गणले जाणार नाही.”
तसेच गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राज्यातील बिबट्यांना आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे सांगितले. “राज्यातील काही भागांत जास्त बिबटे आहेत. आफ्रिकेत वाघ आणि सिंह आहेत, पण बिबटे नाहीत. महाराष्ट्रातील काही बिबटे तिथे पाठवण्याबाबत केंद्रीय वनखात्याला प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. काही बिबटे वनताराला (Wildlife Sanctuary) देखील पाठवले जातील,” असे ते म्हणाले.
सरकारी योजना आणि नियोजनानुसार प्रत्येक जंगलात बिबट्यांची संख्या संतुलित राहील, आणि त्यांना जंगलातच पुरेसा भक्ष्य मिळेल. यामुळे बिबटे गावात येऊन कुत्रे किंवा माणसांवर हल्ला करणार नाहीत, असा उद्देश या पावलाचा आहे.