लिंबाची साल फेकून देऊ नका, कारण लिंबाच्या सालीचे आहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

लिंबाच्या रसामुळे अनेक वेगवेगळ्या फायदे होतात. एखाद्या पदार्थांमध्ये आंबटपणा येण्यासाठी लिंबाचा वापर अनेकजण करत असतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात लिंबाचे रस प्यायला देखील अनेक जणांना आवडते. मात्र लिंबाच्या सालीचे देखील अनेक फायदे असतात, हे तुम्हाला माहिती आहे का?, नसेल माहिती तर जाणून घ्या.

चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो. यामुळे इतर साबण वापरण्यापेक्षा याचा वापर केला जाऊ शकतो.

ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते. फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते.

लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखे स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखे तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.

लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. संशोधना नुसार आपण जर रोज एक ते दोन ग्रॅम क जीवनसत्त्वाचे सेवन केले तर आपल्याला व्हायरल ताप आणि सर्दी होण्याची शक्यता ही ८ टक्क्याने कमी होते.

कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी. सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही. यामुळे आपल्याला तो बदलायचा जास्त त्रास होणार नाही.

ताज्या बातम्या

भारीच! भाभीजीने हरयाणवी गाण्यावर साडी घालून केला डान्स; लाखो लोकं झाले डान्सचे फॅन

गेल्या २२ वर्षांपासून सनी देओल आणि करिश्मा कपूर लढत आहेत एकच केस

गुजरातमधील धक्कादायक घटना! सापाची हत्या करणाऱ्या एकाच घरातील २ जणांचा नागिणीने घेतला बदला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.