लंडनची मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी आले; आता गायी म्हशींच्या व्हिडीओतून महिन्याला ५ लाख कमावतात

मुंबई। बऱ्याच लोकांचे स्वप्न असते की परदेशात शिकायला जाणे. मात्र काही जणांना ते आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. मात्र सध्या असं एक दाम्पत्य चर्चेत आहे. जे परदेशातील नोकरी सोडून चक्क भारतातील आपल्या गावी परतलं आहे. ऐकायला नवलच वाटतं, मात्र हे खरं आहे.

या दाम्पत्याच नाव रामदे आणि भारती व हे दोघे आता गावात राहून युट्युब चॅनलद्वारे कमवत आहेत. खरंतर परदेशातील आरामदायी आयुष्य मौजमजा सोडून गावी परतून शेती करण्यासाठी प्रचंड आवड, मनाचा मोठेपणा व जिद्द लागते. तीच जिद्द या दाम्पत्याकडे आहे. हे दाम्पत्य गुजरातमधील असून त्यांनी देखील परदेशातून गावी परतले व शेती करण्यास सुरुवात केली.

व आज हेच जोडपं चांगली कमाई करत आहे. रामदे आणि भारती दोघेही ब्रिटनमध्ये राहत होते. भारतापासून दूर पण त्याला तिथले जीवन आवडले नाही. रामदेची बहीण यूकेमध्ये राहते. तो २००६ ते २००८ पर्यंत त्यांच्यासोबत राहिला आणि नंतर आपल्या मायदेशी परतला. लग्नानंतर, तो २०१० मध्ये पुन्हा यूकेला गेला.

तिथे काम करायला सुरुवात केली. लंडनमध्ये रामदे आणि भारती यांना लाखोंच्या घरात पगार मिळत होता. दोघेही छान घर सांभाळत होते. व त्यानंतर या दोघांनी गावी परतून शेती करण्याचा निर्णय घेतला. भारतीला तिचा अभ्यास सुरू ठेवावा लागला, म्हणून तिने तेथून हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवायला सुरुवात केली. आयुष्य स्थिर होते.

भारतीचा अभ्यासही संपला, तिला नोकरीही मिळाली. पण रामदे गावात राहणाऱ्या त्याच्या आई -वडिलांची काळजी करत होते. रामदेव एकुलता एक मुलगा आहे. रामदेवच्या घरात संपूर्ण शेतीच वातावरण असल्याने रामदे यांना शेतीत कोणतीही अडचण आली नाही. शेती करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. यासोबतच त्यांनी पशुपालनही सुरू केले.

सात म्हशी विकत घेतल्या. त्याच्याकडे दोन घोडेही आहेत. एक कुत्रा देखील आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितले की आम्ही यूट्यूबवरून पैसे कमवण्याचा विचार केला न्हवता. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षणाचे व्हिडीओ मोबाईलवरून शूट आणि अपलोड करायचो, जेणेकरून ते यूट्यूबवर सेव्ह केले जातील आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा ते पाहून आम्हाला तो क्षण जाणवू शकेल.

फक्त आठवणी जपण्यासाठी व्हिडिओ अपलोड करणे सुरू केले. म्हणूनच स्क्रिप्टिंग किंवा एडिटिंग केले नाही. एका व्हिडिओमध्ये गायी आणि म्हशींना चारा भरताना दिसतात, तर इतर स्टोव्हवर स्वयंपाक करत आहेत. काही व्हिडीओमध्ये ते शेतात काम करताना दिसत आहेत, तर काहींमध्ये ते त्यांच्या पालकांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहेत.

व हेच साधे सोपे व्हिडिओज चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. रामदे म्हणाले की, ‘व्हिडिओ VIRAL झाल्यानंतर, आम्ही यूट्यूब व्हिडीओसंबंधी सर्व माहिती, यूट्यूब चॅनेलची कमाई कशी करायची याबद्दल गुगलवर शोध घेतला. व्हिडिओ अपलोड करण्याचे धोरण काय आहे? व्हिडिओ कसे बनवले जातात?

आम्हाला माहित होते की आमच्या गावात जी जीवनशैली आहे ती वेगळी आहे, शहरातील लोकांना ही जीवनशैली माहीत नाही, शहरातील सर्व लोकांसाठी ती नवीन आहे. म्हणूनच आम्ही फक्त नैसर्गिक व्हिडिओ अपलोड करायचो. ’जसे शेतात एकत्र अन्न खाणे, पालकांसोबत वेळ घालवणे, शेती करणे, घोड्यांसह मजा करणे, ट्रॅक्टर चालवणे, पूजा आरती करणे.तरीही महिन्याला साडेचार लाख रुपये यूट्यूब व्हिडीओजमधून बनवले जातात. व ते चाहत्यांना प्रचंड आवडतात.
महत्वाच्या बातम्या
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेमुळे झाला असं लोकं का म्हणतात? वाचा.. 
आईसोबत फिरून त्याने विकल्या बांगड्या, पण जिद्दीने IAS अधिकारी होत केले आईच्या कष्टाचे चीज 
घटस्फोट म्हणजे फुकटचे मिळालेले पैसे! शिखर आयेशाच्या घटस्फोटाच्या बातमीने नेटकरी संतापले 
अमेरिकेच्या रॅपरला लाईव्ह शोमध्ये एका झटक्यात बसला १७४ कोटींचा फटका; वाचा नक्की काय घडलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.