‘या’ योजनेंतर्गत आता १० रूपयांना मिळणार एलईडी बल्ब! वाचा सविस्तर..

मुंबई । केंद्र सरकारच्या ग्राम उजाला या महत्वाच्या योजनेंतर्गत देश हा सर्वत्र प्रकाशमय करण्यात येणार आहे. यामध्ये वाडय़ा, वस्त्या प्रकाशमान करण्यात येणार आहेत.

हा महत्वाकांक्षी निर्णय एनर्जी एफिसीयंसी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ने घेतला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ६० कोटी लोकांना ७० रूपयांचा एलईडी बल्ब केवळ १० रूपयांमध्ये दिला जाणार आहे.

आपल्या देशात पाच लाखाहून अधिक खेडी-पाडे, वाड्या- वस्त्या आहेत. सध्या त्याच्यापर्यंत काही प्रमाणात वीज पोहचली आहे.

वीज पुरवठा होत असला तरी त्यांच्याकडून म्हणावी तशी विजेची बचत होत नाही. तसेच विजेची बचत करणारी विद्युत उपकरणे खरेदी करणे त्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही.

ही योजना कोणत्याही अनुदान किंवा शासकीय मदतीशिवाय करण्याची योजना आहे. हे पाऊल मेक इन इंडियाला तसेच भारताच्या हवामान बदलाच्या धोरणाला पुढे आणण्यासाठी चालना देणारी मानली जात आहे.

७० रूपयांचा बल्ब १० रूपयांना दिल्यानंतर उर्वरित ६० रूपयांचा भार ईईएसएलवर पडणार आहे. कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून कंपनी त्याची भरपाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता देशात विजेची देखील बचत होण्यास मदत होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.