वेटरचं काम सोडून ‘हा’ अभिनेता बनला होता बॉलिवूडचा स्टंट मास्टर, आज त्याचाच मुलगा देतो कलाकारांना काम

७० च्या दशकातही चित्रपटांमध्ये स्टंटबाजीवर जास्त भर दिला जात होता. या चित्रपटात स्टंटसोबतच खलनायकही खूप महत्त्वाचा होता. खलनायकाशिवाय चित्रपटाची कथा अपूर्ण मानली जात होती. त्या काळात बॉलीवूडमध्ये एक अभिनेता आला ज्याने आपल्या स्टंट्सने मोठ्या दिग्गजांना स्पर्धा दिली होती. या अभिनेत्याचे नाव होते ‘एमबी शेट्टी’.

वास्तविक, एमबी शेट्टी जो ७० च्या दशकात प्रसिद्ध खलनायक होते आणि नंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टंटमॅन बनले होते. एमबी शेट्टी हे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचे वडील होते. एम.बी.शेट्टी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात फाईट इन्स्ट्रक्टर म्हणून केली. त्यानंतर ते अॅक्शन डायरेक्टर आणि नंतर अभिनेता झाले.

एम बी शेट्टी यांनी १९५७ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘त्रिशूल’ ‘डॉन’, ‘कसमें वादे’ यांसारख्या डझनभर चित्रपटांमध्ये त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले. अभिनयासोबतच एम बी शेट्टी यांनी स्टंट कोऑर्डिनेटर, फाईट कंपोजर, स्टंट कंपोजर आणि स्टंट मास्टर म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

या चित्रपटांमध्ये ‘जब प्यार किसी से होता है’ (१९६१), ‘काश्मीर की कली’, ‘सीता और गीता’, ‘डॉन’ आणि ‘द ग्रेट गॅम्बलर’ यांचा समावेश आहे. एमबी शेट्टी यांनी यापूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले होते. त्यांना अभ्यासात रस नव्हता, त्यामुळे वडिलांनी त्याला मुंबईला पाठवले.

तिथे काही काम शिकून उदरनिर्वाह होईल, असा विचार करून मुंबईत आल्यानंतर एम.बी.शेट्टी यांनी प्रथम वेटर म्हणून काम केले, पण त्यातही त्यांचे मन लागल नाही आणि त्यांनी बॉक्सिंगमध्ये प्रवेश केला. एमबी शेट्टीने बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी दाखवली. बॉक्सिंगमध्ये त्यांनी एकामागून एक अनेक स्पर्धा जिंकल्या.

एम बी शेट्टी यांनी जवळपास ८ वर्षे बॉक्सर म्हणून काम केले. त्यांना अ‍ॅक्शन आणि स्टंटची इतकी आवड होती की ते त्यांच्या घरामध्ये जगप्रसिद्ध खलनायकांचे फोटो लावत असे, पण एक अपघात घडला ज्याने एम बी शेट्टीला सर्वांपासून दूर नेले. असे म्हटले जाते ते त्यांच्या घरात घसरून पडले आणि त्यांना मोठी दुखापत झाली.

एक, स्टंट करताना त्यांच्या पायाला खूप दुखापत झाली होती. यासोबतच ते दारूचे शौकीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम झाला. कदाचित याच कारणामुळे ते घसरून पडले आणि स्वतःला सावरु शकले नाही. त्यानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

एमबी शेट्टी यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्याकडे एकही चित्रपट नव्हता आणि जगणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला कामासाठी पुढे यावे लागले. आता त्यांचा मुलगा रोहित शेट्टी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक बनला आहे. त्याने आता अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

रोहितचे चित्रपटही अॅक्शनने भरलेले असतात. रोहित शेट्टीने अजय देवगणपासून ते शाहरुख खानसोबत काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अक्षय कुमारसोबत सध्या रिलीज झालेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.