अनेकांना प्राण्यांवर प्रेम आहे, पण अहमदाबादच्या झंखना शाह(Jhankhana Shah) सांगतात की, तिने प्रेमापोटी नव्हे तर त्यांच्या दु:खामुळे प्राण्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले. ४५ वर्षीय झंखनाचे प्राण्यांबद्दलचे प्रेम तिच्या वडिलांना पाहिल्यानंतर आले. आपल्यापैकी अनेकांप्रमाणे तीही आजूबाजूच्या कुत्र्यांना ब्रेड आणि बिस्किटे द्यायची.(leaving-good-government-jobs-to-care-for-stray-dogs)
परंतु काही जखमी कुत्र्यांना चालता येत नसल्याने त्यांना अन्न मिळणे कठीण असते, अनेकांना अशा कुत्र्यांजवळ जाण्याची भीती वाटते. तर अशा प्राण्यांना अधिक प्रेमाची गरज असते. वर्षापूर्वी झंखानाने असाच एक कुत्रा पाहिला होता, ज्याचा पाठीचा कणा तुटलेला होता. त्याला नीट चालताही येत नव्हते.
तिने या कुत्र्यावर उपचार करून घेतले आणि या घटनेनंतर तिला भेटलेल्या सर्व जखमी कुत्र्यांवर उपचार, जेवण अशा सर्व जबाबदाऱ्या तिने घेतल्या. या कामाची तिची ओढ एवढी वाढू लागली की तिने आपले आयुष्य या प्राण्यांच्या सेवेसाठी वाहून द्यायचे ठरवले. तिला तिच्या आई-वडिलांचाही पूर्ण पाठिंबा मिळाला.
तिने हे काम सुरू केले तेव्हा ती शिकत होती. शिक्षणानंतर ती अहमदाबादमध्येच खाजगी नोकरी करू लागली. यासोबतच ती प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक एनजीओशीही जोडलेली होती, जिथून तिला अनेक प्रकारची माहिती मिळू लागली. तिला हळूहळू प्राण्यांचे हक्क आणि त्यांच्यावरील क्रूरतेशी संबंधित शिक्षा याबद्दल देखील माहिती मिळाली.
तिने स्वतः कायद्याचेही शिक्षण घेतले आहे, त्यामुळे तिला या सर्व गोष्टी समजून घेणे आणि अंमलात आणणे थोडे सोपे होते. दरम्यान, झंखना जीएसआरटीसीमध्ये सरकारी नोकरीही मिळाली. या कामात ती दिवसाचे १४ तास घालवायची, त्यामुळे तिला आजूबाजूच्या कुत्र्यांना दोन वेळचे जेवणही देता येत नव्हते. याचा तिला इतका त्रास झाला की तिने महिनाभरातच नोकरी सोडली.
सध्या ती घरून कपड्यांचा व्यवसाय करते आणि आईसोबत राहते. २०१९ मध्ये, तिने आणखी निधीच्या आशेने करुणा चॅरिटेबल ट्रस्ट देखील सुरू केला आहे. मात्र आता कुत्र्यांना वाचवण्याचे काम ती एकटीच करते. तर कुत्र्यांना खायला देण्याच्या कामात तिचे काही मित्र आणि नातेवाईकही तिला साथ देतात. त्याचबरोबर ट्रस्टच्या माध्यमातून तिला ४० टक्के आर्थिक मदत मिळते, बाकीचा खर्च ती स्वतः उचलते.
सुमारे १३५ कुत्र्यांना दोन वेळचे जेवण देणे हे त्यांचे रोजचे काम आहे. यासाठी महिन्याला सुमारे २० हजार रुपये खर्च येतो. तिच्या कामातील सर्वात मोठ्या आव्हानाविषयी बोलताना ती म्हणते, “अनेक लोक स्वतः प्राण्यांना अन्न देत नाहीत तर इतरांना ते करण्यापासून रोखतात. मग कुत्रे किंवा इतर प्राणी कुठे जाणार? या प्राण्यांसाठी आपण सर्वांनी थोडी अधिक माणुसकी दाखवली पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या
भारताला विश्वगुरू का म्हणतात? त्यामध्ये नालंदा विश्वविद्यालयाचे काय योगदान आहे? वाचा इतिहास
ते मला सोडून गेले, त्यांनी मला साथ दिली नाही, त्यामुळे.., अर्षद वारसीचा अमिताभ बच्चनबद्दल मोठा खुलासा
नवज्योत सिद्धू जज असताना त्यांच्यासमोर कॉमेडी करायचे भगवंत माने, आता त्यांना हरवून होणार मुख्यमंत्री
‘आपचा ताप आम्हाला नाही’, गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी ठरली खरी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल