पुस्तक सोड, चखना आन, तुझा मुलगा कुठे कलेक्टर होणार आहे? पण तोच मुलगा झाला कलेक्टर, जाणून घ्या…

मुंबई । अनेकदा आपण बघत असतो की परिस्थितीमुळे अनेक हुशार तरुण अर्धवट शिक्षण घेतात. मात्र काहीजण परिस्थितीवर मात करून मोठे नाव कमवतात. पुढे कष्ट करुनही गरीबीतच त्यांचे आयुष्य जाते. मात्र शिक्षणाचा प्रकाश तीव्र असतो. शिक्षण असेल तर आपण यातून बाहेर येऊ शकतो.

अशीच एक घटना सध्या घडली आहे. एका आदिवासी मुलाची, कहाणी अशीच आहे. तुमच्यापुढे कोणतीही परिस्थिती असेल, तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्थरातून आले असाल, तरी देखील ही कहाणी तुमच्यासाटी प्रेरणादायी आहे. ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

भिल्ल ही आदिवासी जमात आहे. शेतकऱ्यांकडे मजुरी करणे, पक्षांची शिकार करणे, दारु बनवणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय समजला जातो. हा समाज खूपच गरीब आहे. सर्वांचे हातावर पोट. यामुळे आयुष्यात गरिबीच असते. यामुळे असच आयुष्य काढायचं.

अशीच एक आदिवासी महिला आपल्या झोपडीत मुलासह राहायची. उदारनिर्वाहासाठी दारु विकणे हा त्यांचा व्यवसाय. या महिलेचा नवरा वारला, तेव्हा ती गर्भवती होती, गर्भपात करण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव होता. पण तिच्या बहिणीने तिला साथ दिली, तिच्या २ मुलांना आपल्या घरी आसरा दिला.

ही महिला धुळे जिल्ह्यातील सामोडे गावात राहायला आली. तिचा एक मुलगा फाटक्या कपड्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकत होता. तो अभ्यासात हुशार होता. मात्र तो पुढे जाऊन अस काही करेल हे कोणालाही माहिती नव्हते. पण त्यांच्या पोटाचे वांदे होते. ती म्हणते आम्ही उपाशीही राहायचो. थंड म्हणजे शिळ्या भाकरी खायचो.

त्यांना दारुविक्रीतून दिवसात ५० ते १०० रुपयेच यायचे, पण त्यालाही खर्च होता. दारु पिणाऱ्यांची मैफल आणि त्या बाजूला मन लावून अभ्यास करणारा हा मुलगा. यामध्ये तो अभ्यास करायचा. तेव्हा त्याने कसा अभ्यास केला असेल, असा प्रश्न अनेकांना पडला.

मुलाच्या हातात पुस्तक पाहून दारुडे मुलाला म्हणायचे, ये पोरा, दुकानावर जा आणि चखणा घेऊन ये, त्याच्या आईलाही म्हणायचे, तुझ्या मुलाला दुकानावरुन चखणा आणायला सांग. तुझा मुलगा एवढा अभ्यास करुन काय कलेक्टर होणार आहे? पण ती महिला म्हणत असे, नाही, तो चखणा आणणार नाही.

मात्र हा राजेंद्र भारुड नावाचा मुलगा आज नंदूरबार जिल्ह्याचा कलेक्टर आहे. त्यांच्या आईला समजत होते की हा मुलगा पुढे काहीतरी होणार आहे. ते डॉक्टर झाले. २०१२ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. आयएएस झालेल्या डॉ. राजेंद्र भारुड यांनी ‘मी एक स्वप्न पाहिले’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

ताज्या बातम्या

“दरेकरांनी अडवली मुख्यमंत्र्यांची गाडी, नार्वेकर म्हणाले, साहेब यांना गाडीत टाका आणि शिवबंधन बांधा”

मोठी बातमी! टीआरपी घोटाळा प्रकरणी आरोपपत्र सादर, अर्णब गोस्वामी आरोपी घोषित

डोंगरावर जाऊन सेक्स करणे कपलला पडले महागात; ‘तो’ क्षण वेब कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊन व्हिडिओ झाला व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.