जाणून घ्या मुंबईतील ह्या भन्नाट व अद्भूत ठिकाणांबद्दल; माहिती वाचून चकीत व्हाल

मुंबई हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं मुंबईची गर्दी, लोकल रेल्वे, मोठमोठ्या इमारती आणि बरंच काही. या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून पोट भरण्यासाठी लोक येत असतात. मुंबई सारख्या शहरात कुणी उपाशी पोटी झोपू शकत नाही कारण इथं कामही लगेच मिळते.

हे शहर आणखी एका गोष्टीसाठी प्रसिध्द आहे ते म्हणजे मुंबईतील पर्यटनस्थळ. मुंबईत देशातून आणि देशाबाहेरून पर्यटक येत असतात. मुंबईत काही अशी ठिकाणं आहेत ज्याबद्दल आजुनही आपल्याला माहित नसतील. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

गेट ऑफ इंडिया- भारताचे प्रवेशद्वार म्हणून गेटवे ऑफ इंडियाला ओळखले जाते. मराठी माणसाने याचं डिझाईन केलं होतं. किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारतास भेट दिली होती. त्यामुळे हे बांधण्यात आलं होतं.

एलिफंटा लेणी- या लेणीचं जुनं नाव घारापुरी होतं. पोतुर्गिजांनी नाव बदलून एलिफंटा ठेवलं होतं. एलिफंटा लेणी ब्रम्हा, विष्णू, महेश या देवतांचे दर्शन घडवते. गेट वे ऑफ इंडिया येथून या लेणीवर येण्यासाठी बोटीतून यावे लागते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील एक मोठं रेल्वे स्थानक आहे. भारतातील कानाकोपऱ्यातून येथे रेल्वे येत असतात. या रेल्वे स्टेशनची इमारतही खुपच सुंदर आहे.

समुद्रकिनारे- मुंबई समुद्रकिनाऱ्यावर वसलेले शहर आहे. समुद्रकिनाऱ्याचा नजारा डोळ्याचा पारणं फेडणारा आहे. गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, जुहू बीच अशा अनेक ठिकानांवर पर्यटक गर्दी करत असतात.

चैत्यभूमी- सविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ चैत्यनभूमी आहे. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात.

हाजी अली- समुद्रामध्ये हा दर्गा आहे. येथे जाण्यासाठी समुद्राला ओहोटी असेल तरच जाता येते. समुद्रामध्ये हा दर्गा असल्याने समुद्र आणि दर्गा यांचं नयनरम्य दृश्य नजरेस येतं.

जहांगीर कला दालन- कलाकारांचं केंद्रबिंदू म्हणून याला ओळखले जाते. के के हेब्बर आणि होमी भाभा यांच्या इच्छेमुळे सर कवासजी जहांगीर यांनी याची स्थापना केली होती. या दालनात अनेक नवीन जुन्या कलाकारांची कला पाहायला मिळते.

क्रॉफ्रर्ड मार्केट- या मार्केटमध्ये वस्तू अगदी कमी दरात मिळतात. बॉम्बेचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांच्या नावावर याचे नाव क्रॉफ्रर्ड मार्केट ठेवण्यात आले आहे. शॉपिंगसाठी हे उत्तम ठिकान आहे.

मलबार टेकडी- मलबार टेकडी परिसराला शहरातील जास्त गर्दीचा भाग म्हणून ओळखले जाते. अनेक नेते, मोठे उद्योजक आणि चित्रपटातील कलाकारांची घरे या परिसरात आहेत. टेकडीवर वाळकेश्वराचे मंदिर आहे. मुंबईतील सर्वात उंच ठिकाण म्हणून याला ओळखले जाते.

मणी भवन- हे एक संग्रहालय आहे. महात्मा गांधी ज्यावेळी मुंबईत आले होते तेव्हा ते इथे राहत होते. या संग्रहालयात महात्मा गांधीजींच्या वस्तू आणि पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

नेहरू तारांगण- या ठिकानी आपण आलो तर एक वेगळ्याचं जगात आल्यासारखं वाटतं. प्रोजेक्टरच्या साहाय्याने अंतराळातील हालचाली पाहू शकतो. याची इमारत ही पाहण्यासारखी आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक
फोनचा पासवर्ड विसरलात? ‘या’ काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून क्षणात करा अनलॉक
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं; वाचा लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आजी-आजोबांची भन्नाट गोष्ट

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.