मांजरीची शिकार करायला गेलेल्या बिबट्याला मांजरीने घडवली अशा प्रकारे अद्दल की…. पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेक प्राण्यांच्या संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि लोक त्या व्हिडिओला आवडीने बघत सुद्धा असतात. कधी कधी काही व्हिडिओमध्ये आपल्याला विश्वास करणं कठीण होत की, वास्तविक असं होत असेल का?

अशीच एक घटना नाशिक मधली बिबट्या आंणि मांजरीची. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल झालं असं की, मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्याने मांजरीवर हल्लाबोल केला. पळत असताना बिबट्या आणि मांजर दोघेही विहिरीत पडतात यांनतर दोघेही आमने सामने येतात.

यावेळी मांजरही स्वतःच्या बचावासाठी तीच रूप दाखवते एका क्षणासाठी बिबट्या मांजरीला घाबरताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र नंतर या दोघांनाही वन विभागाने सुरक्षित बाहेर काढले गेले, पण बिबट्या आणि मांजर यांच्यात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

काही लोक तर मांजरीच्या हिंमतीची स्तुती करत आहेत. कारण हार मानण्याऐवजी तीने स्वतःहून कित्येक पटीने शक्तिशाली असणा-या बिबट्याशी सामना केला. वन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की, ही घटना सिन्नर तालुक्यातील काकोरी गावात झाली आहे.

शनिवारी रात्री मांजरीच्या मागे पळताना दोघेही विहिरीत पडले. ही विहीर गावातील एका स्थानिक रहिवाश्याची आहे. रविवारी सकाळी शेत मालकाला आणि गावातील लोकांना विहिरीतून बिबट्याचा आवाज ऐकला.

त्यांनंतर शेत मालकाने गावातील लोकांच्या साहाय्याने वन विभागाला या घटनेबद्दल कळवले. यानंतर त्या दोघांनाही बाहेर काढलं गेलं. क्रेनच्या साहायाने दोन्ही प्राण्यांना वन विभागाने २५ ते ३० फूट खोल असलेल्या विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले.

 

महत्वाच्या बातम्या
‘तारक मेहता’ मालिकेला पूर्णविराम? शुटींग थांबल्याने चाहते झाले अस्वस्थ; काय आहे शुटींग थांबण्यामागचे कारण?
आईकडूनच घेतला अभिनयाचा धडा! ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील शलाका आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी..
आईशप्पथ! श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले फिदा..पाहा व्हायरल फोटो
२० गुंठा जागेत लावले ड्रॅगनफ्रूट आणि पुढच्या २० वर्षांची काळजी मिटली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.