नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही; नांगरे पाटलांचा लालबागमध्ये थेट इशारा

मुंबई । आजपासून राज्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी नियम लागू केले असले तरी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी अनेकजण नियम धाब्यावर बसवून सण साजरे करताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण होऊ शकतो. यामुळे तिसरी लाट येऊ शकते.

आता मात्र नियम तोडणाऱ्यांना पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले, नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, लालबागमध्ये जाऊन त्यांनी हा इशारा दिला आहे.

त्यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली. येथील दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिकांनी विरोध केला होता. मग पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा करुन मध्यस्थीचा मार्ग काढला, आणि दुकाने सुरु करण्यात आली.

नांगरे पाटील म्हणाले, की आरतीसाठी १० लोकच असतील. दुकानांमध्ये दोन माणसांना परवानगी मिळेल. १४४ च्या ऑर्डरमध्ये मॉडीफिकेशन केले आहे. यात कोणी सेलिब्रिटी असतील, व्हीआयपी असतील की आणखी कोणी याबाबत पोलिसांना काही देणंघणं नाही, असेही विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

या काळात गर्दी होऊ शकते, यामुळे कोरोना वाढू शकतो, लालबागचा राजा परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी मंडळाचे स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन घेईल. कोणीही असला तरी हायगय केली जाणार नाही. नियम पाळावे लागतील.

दहा लोकांना आरतीसाठी परवानगी असेल, दहा जणांमध्ये कोण सेलिब्रिटी किंवा कोणी नेता असो त्याच्याशी पोलिसांचं देणं घेणं नाही, पण गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊ, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे आता पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.