छातीत दुखत असतानाही लक्ष्याची आई हसत होती, वाचा लक्ष्याच्या आयुष्यातला न ऐकलेला किस्सा

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या आदराने घेतले जाते. या अभिनेत्याने आपल्या अनोख्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीवर एकेकाळी राज्य केले होते. मराठी माणसाच्या मनामध्ये त्यांचे एक वेगळे स्थान होते.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये झपाटलेला, धुमधडाका, असी ही बनवाबनवी, थरथराट, अफलातून असे अनेक चित्रपट आजही लोक मोठ्या आवडीने पाहतात. त्यांच्या एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक किस्से सांगितले होते.

ही मुलाखत त्यांनी सह्याद्री वाहिनीली दिली होती. त्यामध्ये त्यांना प्रेरणा कोठून मिळते हे त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की माझ्या आईमुळे मला अभिनय किंवा विनोद करण्यास प्रेरणा मिळते. त्यांच्या आईचे नाव रजनी होते. त्यांचे संपुर्ण आयुष्य गरीबीत गेले होते.

त्यांच्या आईने खुप कष्ट करून आपल्या मुलांना लहानासे मोठे केले होते. परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना कधीही आपली स्वप्ने पुर्ण करता आली नाहीत. पण त्यांच्या आईच्या तोंडावर कधीही दुख दिसले नाही. त्या नेहमी हसमुख राहायच्या.

त्यांचा स्वभावही खुप मनमिळाव होता. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या आनंद शोधायच्या. त्यांच्या आईकडूनच लक्ष्मीकांत बेर्डेंना विनोदाचा वारसा लाभला आहे. त्यांनी कायम आपल्या आईसारखा विनोद करण्याचा प्रयत्न केला होता.

मुलाखतीत लक्ष्याने आपल्या आईचा एक किस्सा सांगितला. त्यांची आई आजारी होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. परंतु त्याच दिवशी डॉक्टरांचा संप होता त्यामुळे उपचार करण्यासाठी अडचणी येत होत्या.

तेवढ्यात रजनी असा आवाज दिल्यानंतर त्यांच्या आईला उपचारासाठी नेण्यात आले. पण आणखी एका महिलेचे नाव रजनी होते त्यांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे लक्ष्मीकांत आणि त्यांचे भाऊ यांना काहीच कळत नव्हते की काय चालले आहे.

पण त्यावेळीसुद्धा त्यांच्या आईने सगळ्यांना हसवायचे सोडले नाही. त्यांच्या आई रजनी जोरजोरात हसू लागल्या. कारण आतमध्ये ज्या रजनीला बोलावण्यात आले होते तिची डिलीव्हरी होणार होती. तेव्हा लक्ष्मीकांत यांच्या आई रजनी म्हणाल्या की आता या वयात माझी डिलीव्हरी करणार का? असं म्हणत त्या हसू लागल्या.

त्यांच्या छातीत दुखत असतानाही त्यांनी तेथील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या यशाच्या मागे त्यांच्या आईचा खुप मोठा हात आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जेवढे यश मिळाले त्याचे सगळे श्रेय आपल्या आईला दिले होते. पण हे यश त्यांची आई पाहू शकली नाही याचे दुख नेहमी लक्ष्याला होते.

महत्वाच्या बातम्या
डॅशींग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भर पत्रकार परीषदेत राग अनावर; वाचा पुर्ण किस्सा
HRCT स्कोर 21 असतानाही बेडही मिळेना; जवानानं आईवर शेतातच केले उपचार, असा दिला लढा
कधी एअरपोर्टवर काढली पँट तर कधी तरुणीचा खाला मार; ‘या’ घटनांमुळे सतत वादात आदित्य नारायण
सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारी भाऊ कदम यांची लाडकी लेक करणार मनोरंजन सृष्टीत प्रवेश?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.