महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीचा हा किस्सा ऐकून तुम्ही व्हाल भावूक

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांचे मैत्रीचे किस्से खुप फेमस आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत पण अनेक कलाकारांचे मैत्रीचे किस्से खुप फेमस होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील असाच एक मैत्रीचा किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत. हा किस्सा आहे यारो के योर लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचा

‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे गाणे खास या दोघांसाठीच आहे. विशेष म्हणजे ‘धडाकेबाज’ चित्रपटात हे गाणे या दोघांवरच चित्रीत झाले आहे. हा किस्सा देखील या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचा आहे.

८० च्या दशकामध्ये महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री झाली होती. या दोघांचा ‘धुमधडाका’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटानंतर महेश कोठारे यांना ‘धडाकेबाज’ या चित्रपटाची कल्पना सुचली.

त्यांनी या चित्रपटावर काम करायला सरुवात केली. जेव्हा चित्रपटांच्या पात्रांबद्दल विचार केला. तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेच या भुमिकेसाठी योग्य वाटले.

मग त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना या चित्रपटाची ऑफर दिली. त्यांनी चित्रपटाची कथा, मानधन या सर्वांचा विचार न करता. चित्रपटाला होकार दिला आणि या चित्रपटाचे चित्रीकरण सरु झाले.

याच कालावधीमध्ये सुरज बरजातीया सलमान खानचा डेब्यू चित्रपट ‘मैने प्यार किया’ची तयारी करत होते. त्यांनी या चित्रपटातील एका खास भुमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना ऑफर दिली.

त्यांनी देखील लगेच या चित्रपटाला होकार दिला. हा त्यांचा पहीला हिंदी चित्रपट होता. त्यामूळे ‘धुमधडाका’ चित्रपटाच्या सेटवर महेश कोठारे यांनी पेढे वाटले होते.

यातून समजते की या दोघांची मैत्री किती घट्ट होती. लक्ष्या यांनी महेश कोठारे यांच्याशी चर्चा करुन ‘धडाकेबाज’ च्या शुटींगनंतर ‘मैने प्यार किया’ साठी स्वतःच्या तारखा दिला.

‘धडाकेबाज’च्या शुटींगचा शेवटचा टप्पा सुरु झाला. यात ‘गंगाराम’ या गाण्याचे शूटींग राहीले होते. सगळेच उत्सुक होते.

दुसऱ्या दिवशी शुटिंग होते. पण अचानक या गाण्याच्या शुटींगच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण सेटची लाईट गेली. त्यामूळे चित्रीकरण बंद झाले.

त्यावेळी एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. सर्व काम थांबले होते. म्हणून सर्वजण त्या दिवशी क्रिकेट खेलले. दुसऱ्या चित्रीकरण पुर्ण होईल असे वाटले.

पण दुसऱ्या दिवशीसुद्धा लाईट गेली. त्यामूळे सेटवर सर्वांनाच टेन्शन आले. लक्ष्मीकांत यांनी महेश कोठारे यांचे हे टेन्शन ओळखल.

ते महेशकडे गेले आणि म्हणाले, ‘महेश माझ्या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. पण तु काळजी करु नकोस मी पहीले तुझ्या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण करेल आणि मगच मुंबईला जाईल.’

त्यांचे हे शब्द ऐकून महेश कोठारे भावूक झाले आणि रडायला लागले. या दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली. दोन ते तीन दिवसात धुमधडाका चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाले.

त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे मुंबईला गेले. त्यांनी मैने प्यार किया चे चित्रीकरण सुरू केले. हे दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुपरहिट झाले होते.

यावरुन या दोघांची मैत्री किती घट्ट होती हे समजलेच असेल. लक्ष्मीकांत बेर्डे आज याजगात नाहीत. पण त्यांचे नाव काढल्यानंतर न कळत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.