१९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम आपके है कौन'(Hum Apke Hai Kaun) हा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेत्री रेणुका शहाणे, अनुपम खेर आणि मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील भूमिका केल्या होत्या.(laxmikant berde and madhuri dixit video viral from hum apke hai kaun movie)
‘हम आपके है कौन’ या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेला नोकर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. सध्या मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित सीन शूट करण्यापूर्वी मेकअप करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे चित्रपटातील कुत्रा टफीसोबत खेळत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चाहते भावुक झाले आहेत. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या एका फॅन पेज अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/Cc238EYDqni/?utm_source=ig_embed&ig_rid=3fd7e989-ca89-49c1-91a0-946b25b0b8c8
या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “बॉलिवूडचे ते सोनेरी दिवस.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “लक्ष्मीकांत बेर्डे हा किती दिग्गज अभिनेता होता हे आजकालच्या पिढीला कधीच समजू शकणार नाही. लक्ष्मीकांत बेर्डे हा भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेता होता.”
एका बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, ‘हम आपके है कौन’ ही भारतातील पहिला चित्रपट होता, ज्याने १०० करोड रुपयांच्यावर तिकीबारीवर गल्ला जमावाला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट या विभागात राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. ‘हम आपके है कौन’ चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरज बडजातिया यांनी केलं होतं. सुरज बडजातिया यांनी अभिनेता सलमान खानसोबत ४ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुरज बडजातिया यांनी दिग्दर्शित केलेले ‘हम आपके है कौन’ , ‘ हम साथ साथ है’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार गाजले होते.
महत्वाच्या बातम्या :-
तिच्या बांगड्या फोडू नका, तिचं मंगळसूत्रही काढू नका अन् तिचं कुंकूही पुसू नका; चाकणकरांनी जिंकलं मन
राजनाथ सिंह यांना गडकरींच्या नातवाने केला साष्टांग नमस्कार, संस्कार पाहून सगळ्यांनी केले कौतुक
‘निवडणूकीत जागा दाखवून देऊ’; शिवसेनेनं संभाजीराजेंना डावलताच भडकलेल्या मराठा संघटनांचा इशारा