महेश भट्टच्या सुनेनचं केली त्याची पोलखोल; म्हणाली, माझ्या सासऱ्याने मला..

अभिनेत्री लविना लोध हिने एक व्हिडिओ शेअर करत महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. लविना ही महेश भट्ट यांचे पुतणे सुमित सभरवाल यांची पत्नी आहे. लविना म्हणाली आहे की, महेश भट्ट तिला धमकावत आहेत.

तसेच तिचे पतीही ड्रग्सचा पुरवठा करतात. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. पुढे ती म्हणाली की, मी सुमित सभरवाल यांच्याशी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात खटला दाखल केला आहे

माझे पती सुमित हे सपना पब्बी, अमैरा दस्तुर आणि अशा अनेक अभिनेत्रीना ड्रग्स पुरवठा करण्याचे काम करतात. माझा नवरा मुलीही पुरवतो आणि मला त्याच्या फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या आहेत. महेश भट्ट यांना ही गोष्ट आधीच माहीत आहे.

महेश भट्ट हे या फिल्म इंडस्ट्रीचे डॉन आहेत. जर कोणी महेश भट्टच्या वागण्यानुसार केले नाही तर त्याचे जगणे अवघड केले जाते. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्याकडून कामे करून घेतली आहेत.

ते एक फोन करतात आणि समोरच्याच काम काढून घेतात. ते कोणाच्या डोळ्यासमोर येत नाही अशा प्रकारे त्यांनी अनेक जणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर ते मला सतत त्रास देत आहेत आणि मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

जर उद्या माझ्याबरोबर काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार मुकेश भट्ट, महेश भट्ट, साहिल सहगल आणि सुमित सभरवाल, कुंकुम सहगल हे असतील, असे तिने आपल्या व्हीडिओमध्ये म्हटले आहे.

महेश भट्ट यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी लविनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. दरम्यान, अमायरा दस्तुर हिनेसुद्धा हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

अमायराच्या वकील सविना बेदी यांनी सांगितले आहे की, हे सगळे अमायराला बदनाम करण्यासाठी असे खोटे आरोप केले जात आहेत. जर लविनाने त्वरित माफी मागितली नाही तर तिच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.