खुशखबर! देशातील रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारचे मोबाइल App लाँच; वाचा सविस्तर

मुंबई : वन रेशन वन रेशन कार्ड नंतर केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे मोबाइल अॅप लाँच केले आहे. Mera Ration mobile app असे या अॅपचे नाव असून ते गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

शुक्रवारी माझे रेशन हे अ‍ॅप लाँच केले गेले. याबाबत बोलताना अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव म्हणाले की, वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरुवात केवळ ४ राज्यांमधून ऑगस्ट २०१९ मध्ये झाली होती. अगदी कमी कालावधीत याची अंमलबजावणी देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाली आहे.

दरम्यान, बायोमेट्रिक किंवा आधारद्वारे लाभार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात आणि रेशन घेऊ शकतात. या प्रणालीच्या मदतीने अशा प्रकारच्या प्रवासी कामगारांच्या कुटुंबीयांना त्याच रेशनकार्डमधून दुसर्‍या ठिकाणी परत आल्यास उर्वरित रेशन मिळण्याची सोयदेखील आहे.

असे करा रजिस्टर…
हे अॅप डाउनलोड झाल्यानंतर आपला मोबाइल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्ड संबंधी सर्व माहिती मिळू शकेल. या अॅपवर गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या 

दिलदार मनाचा इशान! सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर इशानने जे केले त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल

भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील

संतापजनक! तहानलेला मुस्लिम मुलगा मंदिरात आला, पाणी नाही पण लाथा-बुक्क्यांचा मार दिला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.