केंद्र सरकारकडून तब्बल १ लाख LPG डिलिव्हरी सेंटर सुरू, सेंटर मिळवण्यासाठी असा करा अर्ज

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे देशावर मोठं संकट कोसळलं आहे. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.  कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारतर्फे अनेक योजना जाहीर करण्यात येत आहेत.

बेरोजगार झालेल्यांसाठी मोदी सरकारने व्यवसाय करण्याची  सुवर्णसंधी आणली आहे. देशात १ लाख एलपीजी डिलिव्हरी सेंटर सुरू करण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे व्यवसाय सुरू करणाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

कॉमन सर्व्हिस सेंटरच्या httas://csc.gov.in/cscspvinfo संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तपासणी केला जाते. यानंतर परवानगी मिळाल्यानंतर बॅंकिंग, विमा, पासपोर्ट, पॅनकार्ड बनवण्याची सेवा देऊ शकता.

तसेच रेल्वे तिकीट बुकींग, वीज बिल, शिक्षण कौशल्य विकास संबंधित कोर्सची सेवाही देऊ शकता. आता केंद्र सरकार सीएसीच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडरही डिलिव्हरी करत आहे.

केंद्र सरकारच्या कॉमन सर्विस सेंटरने ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये एलपीजी डिलिव्हरी सेंटर्स सुरू करण्याकडे भर  दिला आहे. मार्च २०२२ पर्यंत या योजनेची सुरूवात होणार आहे. या योजनेअंतर्गत देशात १ लाख एलपीजी डिलिव्हरी सेंटर्स सुरू  होणार आहेत.

केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरने भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनशी करार केला आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरकडून देशात सध्या २१००० एलपीजी सेंटर सुरू केले  आहे.

कॉमन सर्व्हिस सेंटर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ दिनेश त्यागी म्हणाले, बीपीएलसोबत मिळून देशातील एलपीजी वितरण सेंटर्सची संख्या १०,००० झाली आहे. तसेच एचपीसीएलसोबत ६,००० आणि इंडियन ऑईलसोबत ५,००० एलपीजी वितरण केंद्रे सुरू केली आहेत.

मार्च महिन्यापर्यंत एलपीजी वितरण सेंटर्सची संख्या १ लाखपर्यंत पोहोचेल. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या ५ राज्यांमध्ये सीएससी एलपीजी वितरण केंद्रांची संख्या जास्त आहे.

ग्रामीण भागात अजूनही स्वयंपाकासाठी लाकडे आणि प्रदुषण करणारे इंधन वापरले जाते. कॉमन सर्व्हिस सेंटर डिजीटल सेवा पोर्टलच्या माध्यमातून एलपीजी सिलेंडर लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यास मदत करेल.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुंबईत आढळले म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण, ४ रुग्णांचा झाला मृत्यु
पृथ्वीवरचे तुझे काम संपलेय, तू आता परत ये; साधूने आत्महत्या करून लिहिली सुसाईड नोट
‘तेव्हा मला ड्रायव्हरसमोर जायलाही लाज वाटायची’; व्हायरल क्लिपवर राधिकाने सांगितला अनुभव
कोरोनामुळे होऊ शकतो मधुमेह? आयसीएमआरच्या डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.