हसावं की रडावं! सुनेनी केलं भांडण मग सासरा चढला झाडावर; खाली उतरण्यास सांगुनही ऐकेना

आपल्या आजुबाजुला रोज काहीना काही घडत असतं. मग त्यात सुखाचे प्रसंग असतात तर कधी दुखा:चे. काही प्रसंग कायम आपल्या लक्षात राहतात तर काही आपन लगेच विसरून जातो. अशीच एक घटना मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील हिन्नौद गावात घडली आहे. हे पाहून लोकांना हसावं की रडावं हेच कळलं नसेल.

त्याचं झाल असं की, हिन्नौद गावातील एका सुनेने सासऱ्या सोबत असलेल्या वादाला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली. सासऱ्याला तक्रार दाखल केल्याचे समजल्यानंतर तो घाबरून गावातील एका ८० फुट उंच असलेल्या झाडावर जाऊन बसला. सुनेने आपल्या विरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी असं त्याचं म्हणणं होतं.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हिन्नौद गावातील एका व्यक्तीचे आपल्या मोठ्या सुनेसोबत घरगूती कारणांमुळे सतत भांडणं होत होती. सासऱ्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानंतर सुनेने सासऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होणार होती. त्याआधीच सासरा पिंपळाच्या ८० फुट उंच झाडावर जाऊन बसला.

नातेवाईकांना, गावकऱ्यांना, पोलिसांना १० तास प्रयत्न करून सासऱ्याला खाली उतरवण्यात यश आले. या संपुर्ण प्रकारामुळे हसावे की रडावे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पेट्रोलपंपावर हवा भरण्यासह ‘या’ सुविधा मिळतात मोफत; कुणी देत नसेल तर ‘अशी’ करा तक्रार
लालुप्रसाद यादवांच्या प्रकृतीबाबत गंभीर माहिती आली समोर; वाचून धक्का बसेल
अकोल्याच्या ‘या’ अडीच वर्षाच्या मुलीची स्मरणशक्ती बघून वेड लागेल; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीये नोंद
नेता असावा तर असा! ‘बैठक घेतली रानात अन् वाद मिटवला क्षणात’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.