मुलींची छेड काढणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुंडाची पोलिसी खाक्या दाखवत रस्त्यावरून धिंड काढण्यात आली आहे. यावेळी एका महिला पोलिसाचा दुर्गावतार पाहायला मिळाला. ज्या भागात या गुंडाची दहशत होती, त्याच भागातून पोलिसांनी त्याची वरात काढली. यामुळे त्या परिसरातील सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे.(latur police women beat criminal)
काही दिवसांपासून लातूरमधील(Latur) विवेकानंद चौक परिसरात गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुंडाने दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या भागातील एका मुलीची छेड देखील त्याने काढली होती. त्यावेळी मुलीने विरोध केला असता गौस मुस्तफा सय्यद या गुंडाने तिला फायटरने मारहाण केली होती. या प्रकरणात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
या सराईत गुन्हेगाराविरोधात अनेक पोलीस ठाण्यात १८ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपासून पोलीस या गुंडाचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना गौस मुस्तफा सय्यद हा गुंड ज्ञानेश्वर नगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्या गुंडाला अटक केली.
पण यावेळी पोलिसांनी गौस मुस्तफा सय्यद या गुंडाला पोलीस ठाण्यात नेण्यासाठी पोलीस गाडीचा वापर केला नाही. पोलिसांनी या गुंडाला रस्त्यावरून धिंड काढत पोलीस ठाण्यात नेले. यावेळी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या एका महिला कर्मचाऱ्याने पुढाकार घेत या गुंडाला पोलिसी खाक्या दाखवला. त्यावेळी महिला पोलीसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला.
त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे रौद्र रूप पाहताच गौस मुस्तफा सय्यद हा गुंड रस्त्यावरच माफी मागू लागला. ज्या भागात त्याची दहशत होती, त्याच भागातून पोलिसांनी त्याची धिंड काढली. यावेळी परिसरातील नागरिक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिक सुखावले आहेत.
पोलीस या गुन्हेगाराची धिंड काढत असताना परिसरातील लोक हे दृश्य पाहत होते. पण मोबाइल फोनमध्ये कोणीही या घटनेचे चित्रीकरण केले नाही. पोलिसांच्या या कारवाईमुळे इतर गुन्हेगारांचे देखील धाबे दणाणले आहेत. या कारवाईसाठी त्या भागातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
यामी गौतमनेही द काश्मिर फाईल्सचे केले कौतुक, म्हणाली, काश्मिरी पंडिताशी लग्न केल्यामुळे मला..
मला असं वाटतं, सर्वांनी माझ्या पात्राचा तिरस्कार करावा; ‘द काश्मीर फाइल्स’ची अभिनेत्री अशी का म्हणाली?
सतत हिजाब घालणाऱ्या इरफान पठाणच्या पत्नीचा चेहरा अखेर आला समोर; तिची सुंदरता पाहून चाहते घायाळ