प्रत्येक मुलाची इच्छा असते की त्याची बायको सुंदर आणि फिट असावी. सुंदर म्हणजे ती मुलगी जाडी नसावी. गेल्या अनेक वर्षांपासून बारीक मुलीला सुंदर म्हंटले जाते. पण सध्या प्रेमाची भाषा बदलत आहे. सुंदर दिसण्यासाठी बारीक असायला हवं असे नाही.
हाच संदेश देत टेलिव्हिजनवर एका नव्या मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेत मुलगी जाड असली तरी चालेल. पण मनाने चांगली असायला हवी. असे सांगण्यात आले आहे. याच विषयावर कअर्स मराठीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सुरू आहे.
या मालिकेत अक्षया नाईकने मुख्य अभिनेत्रीची भुमिका निभावली आहे. अक्षयाच्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. जाणून घेऊया लतिकाची भुमिका निभावणाऱ्या अक्षया नाईकबद्दल.
अक्षया नाईकचा जन्म १२ जुलै १९९५ मध्ये महाराष्ट्रातील मुंबईत झाला होता. तिचे सगळे शिक्षण मुंबईत झाले आहे. अक्षया सध्या टेलिव्हिजनवरील खुप प्रसिद्ध नाव आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत ती लतिकाची भुमिका निभावत आहे.
अक्षयाला लतिकाच्या भुमिकेत लोकांनी खुप पसंत केले आहे. पण ही अक्षयाची पहिली मालिका नाही. या अगोदरही अक्षयाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच अक्षयाने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे.
अक्षयाला लहानपणापासूनच अभिनयात खुप आवड होती. म्हणून तिने कॉलेज संपल्यानंतर अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. तिने मालिका आणि चित्रपटांसाठी ऑडीशन द्यायला सुरुवात केली. पण तिच्या वजनामूळे तिला कुठेही काम मिळत नव्हते.
स्टार प्लसचच्या ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत अक्षयाच्या भुमिकेला लोकांनी खुप जास्त पसंत केले होते. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
त्यानंतर तिने ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिकेत काम केले. त्यासोबतच दंगल वाहीनीवरील ‘ये इश्क नही आसान’ मालिकेत महत्त्वाची भुमिका निभावली होती. तिच्या अभिनयाचे खुप जास्त कौतुक करण्यात आले.
अक्षया सध्या कअर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काम करत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांनी खुप चांगला प्रतिसाद दिला आहे. ही मालिका सध्या टेलिव्हिजनवरील टॉपची मालिका आहे.
ही मालिका एका खुप महत्त्वाच्या गोष्टीवर आधारित आहे. या मालिकेत जास्त वजन असणाऱ्या मुलींबद्दल बोलले आहे. मुलींच्या वजनाकडे नाही तर त्यांच्या मनातील सौंदर्याकडे लक्ष द्या असा संदेश देण्यात आला आहे.
अक्षया अतिशय उत्तम पद्धतीने लतिकाची भुमिका निभावत आहे. मालिकेत शांत दिसणारी लतिका खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय मॉडर्न आहे. तिला फिरायला खूप आवडते. अक्षया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. ती तिच्या अनेक फोटो पोस्ट करत असते.
महत्त्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत महालक्ष्मीची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीबद्दल
‘त्या’ एका घटनेने बदलून टाकले होते कॉमेडीयन शेखर सुमनचे आयुष्य
महानायक अमिताभ बच्चनची सुन ऐश्वर्याची प्रॉपर्टी ऐकून तुम्ही थक्क व्हाल; आहे करोडोची मालकीण
धरम पाजीच्या रागाला बघून श्रीदेवी लाईव्ह शोमधून पळून गेल्या होत्या