भलाईचा जमानाच नाही राहिला! गाईला वाचवण्यासाठी गेले आणि गाईने केली अशी अवस्था, पहा व्हिडीओ

आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण असा व्हिडिओ कधीच पहिला नसेल. हा व्हिडिओ पाहून तुम्ही लोटपोट व्हाल. तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिल्या असतील ज्यामध्ये काही लोक अडचणींमध्ये सापडलेल्या प्राण्यांना वाचवतात.

या व्हिडीओची सुरुवातही अशीच होते. एका गाईची मान एका झाडामध्ये अडकलेली असते. तिला वाचवण्यासाठी दोघेजण पुढे येतात. दोघांनी उडी मारून एक फांदी वाकवली आणि गाईची त्या संकटातून सुटका केली.

पण झाले असे की गाईची सुटका होताच तिने त्या दोघांवरच हल्ला केला. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अनविष शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी वरती लिहिले आहे की भलाईचा जमानाच नाही राहिला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाईची मान तिच्या शिंगांमुळे झाडाच्या दोन फांद्यांच्या मध्ये अडकली आहे. ती बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होती. हे पाहून दोघेजण मदतीसाठी पुढे आले.

त्यांनी फांदी खेचून गाईला बाहेर काढलं. सुटका होताच तिने त्या दोघांवरच हल्ला केला. या व्हिडिओला आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसेच २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि २०० पेक्षा जास्त रिट्विट आहेत.

महत्वाच्या बातम्या
..म्हणून रिक्षाचालकाने परत केले चाळीस लाखांचे दागिने; किस्सा वाचून तुम्हाला कौतुक वाटेल
…म्हणून लग्नाआधी मी निकच्या मागे पाठवला होता बॉडीगार्ड, प्रियांकाचा खुलासा
चिरंजीवी सर्जाची पत्नी मेघनाने दाखवली मुलाची पहिली झलक; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
अजित पवारांचे संकेत; कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.