आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही, जाणून घ्या..

जर तुम्हाला कर्जासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी सातबारा उतारा हवा असेल तर आता तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण आता राज्यातील २३ बँकाबरोबर भूमी अभिलेख विभागाने करार केला आहे.

या बँकांना डिजिटल सही असलेला ऑनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जासाठी किंवा बँकेच्या इतर कारणासाठी सातबारा जोडण्याची गरज नाही. महसुल विभागाने राज्यातील सर्व जमीनीचे सातबारा संगणकीकृत करून दिले आहेत.

राज्यातील २ कोटी ५३ लाख सातबारांपैकी २ कोटी ५० लाख ६० हजार सातबारा डिजिटल स्वाक्षरीत केले आहेत. त्यामुळे त्यांची प्रत ऑनलाईन उपलब्ध होत आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने https://g२b.mahabhumi.gov.in बॅंकिंग पोर्टल उघडले आहे.

या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी २३ बँकांनी करार केले आहेत अशी माहिती राज्याचे ई-फेरफार समनव्यक रामदास जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे आता अनेक जणांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते.

या करारामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, एच.डी.एफ.सी.बॅंक, आय.सी.आय.ई.आय. बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक इ. बँकांचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.