आनंदाची बातमी! लवकरच बाजारात येणार एड्सवरील लस, तीन दशकानंतर प्रतिक्षा संपणार

सध्या जग कोरोनाशी लढत आहे. कोरोनाची लसही बाजारात आली आहे जिचा वापर कोरोनाला रोखण्यासाठी केला जात आहे. पण अजूनही जगात असे अनेक रोग आहेत ज्यांच्यावर रामबाण उपाय सापडलेला नाही. पण आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी एचआयव्ही संदर्भातील आहे. या भयंकर रोगामुळे आतापर्यंत अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या तीन दशकांपासून लसीचा शोध सुरू आहे. पण आता यामध्ये आशेचा किरण सापडला आहे. या रोगावर लवकरच लस मिळण्याची शक्यता आहे.

कोरोनाने पुर्ण जगात हाहाकार माजवला आहे आणि त्यातच इबोलाने अफ्रिकेत आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशातच एड्सच्या रूग्णांना लवकरच लस मिळू शकते असे बोलले जात आहे. जगभरात २०२९ मध्ये तब्बल तीन कोटी ८० लाख लोकांनी एड्सची लागण झाल्याचे समोर आले होते.

फेब्रुवारी महिन्यात एड्सच्या लसीच्या शोधाबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये नॉन प्रोफिक ड्रग डेव्हलपर आणि स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने या लसीबाबत घोषणा केली होती. या लसीमुळे इम्युन सेल्स उत्पादन वाढेल असे संशोधनातून समोर आले आहे. ज्यामुळे अँटीबॉडीज निर्मितीसाठी मदत होणार आहे.

पण या लसीला अजून बऱ्याच परिक्षांमधून पास व्हायचे आहे. सध्या या लसीची पहिली ट्रायल चालू आहे. रिसर्चकर्त्यांनी सांगितलं आहे की लसीचा पहिला टप्पा पार केल्यानंतर तिला दुसऱ्या टप्प्यासाठी पाठवण्यात येईल. या लसीने सगळे टप्पे पार केल्यानंतर हिला मानवी वापरासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

या लसीमुळे एड्समुक्त विश्व होण्याकडे पहिलं पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे. लवकरच आनंदाची बातमी पुर्ण जगाला मिळणार आहे आणि एड्स सारख्या भयानक आजाराला आता घाबरण्याचे काहीही कारण नसणार आहे.

महत्वाच्या बातम्या
प्राजक्ता माळीच्या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा फोटो
एका झटक्यात लॉटरी! ओसाड जमीन खोदताना शेतकऱ्याला मिळाले ५ किलो सोने, किंमत आहे करोडोंमध्ये
संभाजी भिडे सर्वात बावळट व्यक्ती; अशा सडक्या मेंदूची विकृत पैदास वेळीच ठेचली पाहिजे
सनी देओलला चित्रपटात घेतले तर पुढच्या चित्रपटात धर्मेंद्र फुकट काम करणार; बाप लेकाची अजब ऑफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.