पुणेकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; पहा काय आहे ही गुड न्युज

पुणे | कोरोनाच्या काळात पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण म्हाडाच्या सुमारे पावणेपाच हजार सदनिका उपलब्ध असून त्यासाठी डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे.

गेल्या वर्षीपासून मध्यमवर्गीय आणि गरीब लोक या सोडतीची वाट पाहत होते ती वेळ आता आली आहे. शिक्षक पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही सोडत निघणार आहे.

गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांनाही याचा लाभ होणार आहे. मार्च एप्रिलमध्ये सोडत काढण्याची तयारी म्हाडाने केली होती पण लॉकडाऊनमुळे ती रद्द करण्यात आली.

यानंतर दिवाळीत सोडत निघेल अशी अपेक्षा सगळ्यांना होती पण दिवाळीतही नागरीकांना निराशा हाती आली. पण आचारसंहिता लागल्यामुळे पुन्हा सोडत पुढे ढकलण्यात आली.

त्यामुळे स्वप्नातील घर मिळवण्यासाठी नागरिकांना थोड्या दिवस वाट पाहावी लागणार आहे. एकूण चार हजार ७२३ सदनिकांसाठी सोडत निघणार आहे. नागरिकांना परवरणाऱ्या दरात सुमारे पावनेपाच हजार सदनिका उपलब्ध आहेत.

म्हाळुंगे, पिंपरी-वाघेरेश पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात या सदनिका आहेत. २१०० सदनिका ह्या म्हाळुंगे-इंगळे (चाकण) भागात उपलब्ध आहेत. ९०० सदनिका ह्या पिंपरी वाघिरे परिसरात उपलब्ध आहेत आणि १७२३ सदनिका ह्या पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी गृहनिर्माण भवन, आगरकरनगर, अलंकार थिएटरमागे, पुणे- ४११ ००१ येथे भेट द्या आणि जर तुम्हाला फोन करायचा असेल तर म्हाडा कार्यालय दूरध्वनी क्रमांक – ०२०-२६१२८८५६, ०२०-२६१२१८३० यावर संपर्क साधा. म्हाडाची वेबसाईटसुद्धा आहे. http://lottery.mhada.gov.in यावर माहिती चेक करू शकता.

महत्वाच्या बातम्या-

बॉस असावा तर असा! कर्मचार्‍यांना बनवले करोडपती, जाणून घ्या..

कसाब विरोधात साक्ष दिली तेव्हाच ठरवले, आता पोलिसच होणार आणि…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.