माझ्यावर विषप्रयोग कोणी केला हे मला माहित होते पण…; लता मंगेशकर यांचा खुलासा

दिल्ली | लता मंगेशकर म्हणजे देशाच्या गाणकोकीळा यांच्यावर विषप्रयोग झाला होता. हा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला आहे. मंगेशकर हे नाव १९६३ साली सगळ्यांना माहीत पडले त्या प्रसिद्ध झाल्या.

त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली होती की दिवसाचे तास लतादीदींनी कमी पडत होते. दिवसभर त्या कामात मग्न असायच्या. याचदरम्यान त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. पण हा विषप्रयोग कोणी केला होता?

यावर लता मंगेशकर म्हणाल्या की, विषप्रयोग कोणी केला हे मला माहित होते पण त्यावेळी माझ्याकडे त्या व्यक्तीविरोधात कसलेच पुरावे नव्हते. त्यांनी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, ही खूप जुनी गोष्ट आहे.

त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. मी इतके आजारी होते की जवळपास तीन महिने मी अंथरुणावर खिळून होते. मी आजारी असल्याने अशाही चर्चा रंगल्या होत्या की, लता मंगेशकर आता पुन्हा गाऊ शकणार नाहीत पण या सर्व अफवा होत्या.

मी बऱ्याच डॉक्टरांकडे गेले पण मला एकाही डॉक्टरांनी असे सांगितले नाही की, तुम्ही गाऊ शकणार नाही. डॉ. आर. पी. कपूर यांनी मला बरे केले. या आजारातून त्यांनी मला बरे केले होते. मला पूर्णपणे अशक्तपणा आला होता.

मी इतके अशक्त झाले होते की, मला उठून चालताही येत नव्हते. मी भविष्यात चालू शकेन की नाही असा प्रश्नही माझ्या मनात आला होता. नंतर काही दिवसांनी मी एकदम बरे झाले आणि पुन्हा गाणे गाण्यासाठी सुरुवात केली, असे लता मंगेशकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

एकीकडे वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे विराटने ठोकले मैदानात शतक; वाचा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग

अर्णब गोस्वामींचा जामीन वाढवत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दिला झटका, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.