Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

‘या’ व्यक्तीवर प्रेम करत होत्या लता दिदी; एका वचनामुळे लग्न होऊ शकले नाही

Prajakta Pandilwad by Prajakta Pandilwad
December 5, 2020
in ताज्या बातम्या, बाॅलीवुड, मनोरंजन, लेख
0
‘या’ व्यक्तीवर प्रेम करत होत्या लता दिदी; एका वचनामुळे लग्न होऊ शकले नाही

भारतीय चित्रपटश्रुष्टीला शंभर वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यातील ७० वर्ष हे लता दिदींच्या गाण्यांनी सजलेली आहेत. भारताच्या कोकीळा म्हणून लता दिदींची ओळख आहे. दिनानाथ मंगेशकर हे लता दिदींचे वडील आहेत. तर आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला मध्येप्रदेशमध्ये झाला. लता दिदींनी त्यांच्या वडीलांकडून संगीताचे धडे घेतले आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी त्यांच्या संगीत प्रवासाची सुरुवात केली. १९४२ मध्ये दिदींचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले.

त्यावेळी लता दीदी ह्या तेरा वर्षांच्या होत्या. वडीलांनंतर कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी लता दिदींवर आला होती. नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायकने त्यांच्या कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी घेतली. लता दिदींनी गायिका आणि अभिनेत्री म्हणून त्यांचा प्रवास सुरु केला.

त्यावेळी लता दिदींनी त्यांच्या भावंडासाठी आई आणि वडील अशा दोन्ही भुमिका पार पाडल्या. त्यांनी त्यांच्या संपूर्ण परीवाराची जबाबदारी पार पाडली. त्यांनतर त्यांनी चित्रपटांमध्ये गायिका म्हणून त्यांचा प्रवास सुरु केला.

लता दिदींनी कधीही मागे न बघता आपले कार्य सुरु ठेवले. त्यांनी आत्तापर्यंत ३० पेक्षा अधिक भाषांमध्ये गायन केले आहे. लता दिदींनी सर्वात जास्त गाणी गायली म्हणून त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

२००१ साली त्यांना भारतरत्न आणि महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कार मिळाले. लता दिदींना चित्रपटातील गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी अनेक भाषांमधून गाणी गावून विक्रम तयार केला आहे.

आता लता दिदींचे वय ९० पुर्ण आहे. त्यांच्या गाण्याची जादू आजही कायम आहे आणि ती जादू पुढे अनेक वर्ष कायम राहणार आहे. दिदींनी तीसहून अधिक भाषांमध्ये चित्रपट आणि नॉन-फिल्मी गाणी गायली आहेत.

चित्रपट गायनात लता दिदींसोबत त्यांची बहीण आशा भोसले यांचे सर्वात मोठे योगदान आहे. त्यांच्या आवाजाचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांची गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. लता दिदी अविवाहित आहेत. त्यांनी लग्न केले नाही.

असे बोलले जाते की, लता मंगेशकरचे राजपूरच्या डोंगर घराण्यातील राज सिंगवर प्रेम होते. अनेक वर्षे या दोघांचे नाते होते. पण त्या दोघांना कधी लग्न करता आले नाही. कारण राज सिंगने त्यांच्या वडिलांना शब्द दिला होता की, ते कधी सामान्य घरातील मुलीशी लग्न करणार नाहीत.

त्याकाळी राजघराणे आणि सामान्य कुटुंब यांच्यामध्ये खूप जास्त अंतर होते. म्हणून राज सिंगने त्यांच्या वडिलांना दिलेला शब्द कधी तोडला नाही. त्यांनी स्वतः देखील आयुष्यभर लग्न केले नाही. ते अविवाहित होते. पण या दोघांची मैत्री मात्र शेवटपर्यंत कायम होती.

महत्त्वाच्या बातम्या –

सुरैयाच्या प्रेमात पागल झाले होते देवानंद; पण ‘या’ गोष्टीमूळे लग्न होऊ शकले नाही

कंगना राणावतची बोलती बंद करणाऱ्या दिलजीत दुसांजची खरी कहाणी वाचा

अमिताभ बच्चनने केली त्यांच्या २८०० कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा

जाणून घ्या ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेतील सुमन नक्की कोण आहे?

Tags: 70 moviesbest movies of bollywoodbollywood love storiesBollywood singersEnteratainmentlata mangeshkarलता मंगेशकर
Previous Post

नागपुरात विजय काँग्रेसचा, पराभव भाजपचा, पण चर्चा फक्त तुकाराम मुढेंची!

Next Post

राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा; टंचाई दूर करण्यासाठी जनतेला मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ताज्या बातम्या

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

January 17, 2021
भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

January 17, 2021
महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

January 17, 2021
“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

January 17, 2021
दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

January 17, 2021
आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

January 17, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.